
(प्रतिनिधी: अमोल खरात)
आज सकाळी जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील वाघूर धरण परिसरात पाण्यात तरंगताना एका महिलेचा मृतदेह दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.
मृत महिलेचे नाव मंगला सुरेश पवार (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे असून, तिच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
धरण परिसरात गावातील काही नागरिक गेले असता त्यांना पाण्यात मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी तातडीने जामनेर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृतदेहाच्या जवळच बॅग व पायातील चप्पल बाजूला ठेवलेली आढळली आहे.
त्यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत साशंकता व्यक्त होत असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.







