
लोणी, ता. चोपडा, जि. जळगाव – संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिला. ग्रामसेवक कुंदन कुमावत यांनी “या दिवसाच्या आयोजनासंदर्भात कोणतेही शासन परिपत्रक किंवा सूचना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या नाहीत” असे सांगितले.
विशेष म्हणजे, ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतीत अनुपस्थित असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासन परिपत्रक नसतानाही, सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा दिवस साजरा व्हायला हवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, या भागात बिरसा मुंडा जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मात्र, यावर्षीचे दुर्लक्ष “दुर्दैवी व शोकांतिका” असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर, माननीय चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांत भाऊ सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम , पंचायत समिती गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व गावकऱ्यांनी केली आहे.
+91 77099 65189
मुबारक तडवी







