
नागरिकांच्या समस्यांचे काय
यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समितीच्या सभागृहात यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यावर तक्रार निवारण सभेत यावल रावेर मतदार संघातील आमदार व यावल चोपडा मतदार संघातील आमदार या दोन्ही आमदारांनी यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व पंचायत समिती मध्ये सुरु असलेल्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली होती व त्यानंतर हि यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या बेजबाबदार पणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असतांना देखील अपारदर्शक यावल पंचायत समितीला पारदर्शक दाखून iso नामांकन देण्यात आल्याने नागरिकांच्या तक्रारींचे काय असे प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतांना दिसून येत आहे.
दि.7 आगस्ट रोजी यावल पंचायत समितीस आयएसओ नामांकन समितिकडून भेट देण्यात आली.त्यासमिती कडून यावल पंचायत समिती ला iso नामांकन देण्यात आले आहे त्यामुळे अनेक प्रश्न iso तपासणी साठी आलेल्या समितीवर उपस्थित होत असून यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या असतांना यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी नागरिकांच्या कोणत्याही प्रकारे तक्रारींचे निराकरण केले नसतांना सुद्धा व नागरीकांन सोबोत असभ्य वागणूक त्यांच्या आशीर्वादाने व पाठींब्याने घरकुल अभियंत्याकडून घरकुल लाभार्थ्यांची लुट,रोजगार हमी योजनांअंतर्गत होणारी लुट, कार्यालयात वेळेवर उपस्थित नसणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन अश्या अनेक तक्रारी असतांना यावल पंचायत समिती ला iso नामांकन कसे असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतांना iso नामांकनासाठी ISO (आयएसओ) पंचायत समितीचे निकष आणि त्याचे महत्व या विषयावर खाली सविस्तर माहिती दिली आहे
ISO म्हणजे International Organization for Standardization. ही एक जागतिक संस्था आहे जी विविध क्षेत्रांतील गुणवत्ता, कार्यप्रणाली आणि सुरक्षितता यासाठी आंतरराष्ट्रीय मानके विकसित करते.
भारतामध्ये, पंचायत समित्यांना कार्यक्षम, पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित सेवा पुरवण्यासाठी ISO प्रमाणपत्र दिले जाते.
ISO प्रमाणपत्र पंचायत समितीला का दिले जाते?
पंचायत समित्यांचे प्रशासन, सेवा देणे, लोकाभिमुखता, दस्तऐवजीकरण, स्वच्छता, आणि इतर व्यवस्थापन कार्यांची गुणवत्ता तपासून त्यांना ISO प्रमाणपत्र दिले जाते. ISO पंचायत समितीचे मुख्य निकष (Criteria):
- सेवा गुणवत्तेचे व्यवस्थापन
ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत आणि अचूक पद्धतीने दिल्या जात आहेत का हे तपासले जाते. - प्रक्रिया दस्तऐवजीकरण
कामकाजाच्या सर्व प्रक्रिया लेखी स्वरूपात व्यवस्थित नोंदविलेल्या असणे आवश्यक आहे. - पारदर्शकता आणि उत्तरदायित्व
निधीचा उपयोग, प्रकल्पांची अंमलबजावणी इत्यादी प्रक्रिया पारदर्शक असल्या पाहिजेत. - लोकसहभाग आणि समाधान
नागरिकांच्या अभिप्रायावर आधारित सुधारणा आणि सेवा उन्नती केली जाते का?5. स्वच्छता व पर्यावरणपूरकता
परिसर स्वच्छ, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन इत्यादीचा आढावा घेतला जातो. - दुरुस्ती व तक्रार निवारण प्रणाली नागरिकांच्या तक्रारींचे निवारण योग्य वेळेत केले जाते का?कार्यप्रणालीत गुणवत्ता सुधारणा ISO मुळे समितीचे काम अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक होते.आदीच्या निकषावर आधारित iso नामांकन दिले जात असतांना आलेल्या समितीकडून काय पाहणी केली गेली आहे आणि समितीने कोणत्या निकषावर आधारित यावल पंचायत समितीला iso नामांकन दिले आहे यावर मोठ्या प्रमाणत प्रश्न उपस्थित होत आहेत.तरी सदर नामांकन साठी आलेल्या समितीची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांन मध्ये चर्चा रंगू लागण्या आहे.







