Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
June 6, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
सोलापूर जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्याच्या दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीने गोळीबार केल्याची थरारक घटना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे घडली. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. खरवंडी कासार , ता. पाथर्डी) हा आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी त्याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील सराफा व्यापारी अभिनंदन काशिनाथ पोद्दार यांना अडवून त्यांच्याकडील सोने लुटल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा समांतर तपास सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या दरोड्यात पावलस उर्फ मेहेर गायकवाड याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक पाथर्डी येथे दाखल झाले. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी कासार बीटचे पो. कॉ. आसाराम बटुळे व गृहरक्षक मिठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.

गुरुवारी (दि. ४ जून) रात्री सुमारे १०.३७ वाजता आरोपी आपल्या घरासमोर काही साथीदारांसह पाइपलाइनचे काम करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र आरोपी पावलस गायकवाड याने पोलिसांचे आदेश धुडकावून लावत त्याने थेट पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. ही गोळी पो. कॉ. बटुळे यांच्या अगदी जवळून गेल्याने मोठी दुर्घटना टळली.

यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने घरासमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची एक्सयूव्ही कार घेतली आणि आपल्या साथीदारांसह भरधाव वेगाने बीडच्या दिशेने पलायन केले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे आपल्या पोलीस पथकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांना सूचना दिल्या. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड व त्याच्या दोन ते तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू असून

Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

Next Post

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Next Post

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026

महापालिका कार्यालयातील ‘हाडाचा कार्यकर्ता’ की अनधिकृत सत्ताकेंद्र? चौकशीची मागणी

June 5, 2026

बीड हादरलं: पैशाचा वादाचा रक्तरंजीत शेवट, मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून केला मित्राचा खून ; अपघाताच्या बनावासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकला

June 5, 2026

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..