Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकास निधीवर डल्ला?सत्ताधारी सरपंच–ग्रामसेवकांच्या संगनमतातून दलित हक्कांवर घाला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक“दलित वस्त्यांचा निधी इतर भागात वळवणाऱ्यांवर नावानिशी गुन्हे दाखल करा”  शमिभा पाटील

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 25, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप समोर येत असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये दलित वस्त्यांच्या विकासासाठी राखीव असलेला निधी इतर भागातील कामांवर वळवण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणी संबंधित सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांवर नावानिशी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती वस्ती विकास निधी हा संविधानिक सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित असून दलित वस्त्यांमध्ये रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, वीज, समाजमंदिरे, स्मशानभूमी आणि इतर मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून राखीव स्वरूपात दिला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये हा निधी दलित वस्त्यांऐवजी इतर भागातील रस्ते, सभामंडप, सौंदर्यीकरण आणि राजकीय हितसंबंध जपणाऱ्या कामांवर खर्च केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी ग्रामसभेची योग्य मंजुरी न घेता, दलित सदस्यांची संमती न घेता किंवा कागदोपत्री बनावट दाखले तयार करून कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही गावांमध्ये दलित वस्त्यांचे नाव दाखवून प्रत्यक्षात इतर भागात विकासकामे झाल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.

“हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून दलित समाजाच्या संविधानिक हक्कांवर घाला आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव निधी हा कोणाची कृपा नसून ऐतिहासिक अन्यायाची भरपाई आणि समान विकासाची हमी आहे. त्यामुळे या निधीचा अपहार हा सामाजिक न्यायाविरोधातील जातीय गुन्हा मानला गेला पाहिजे,” असे शमिभा पाटील यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या
जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती वस्ती निधीची चौकशी करावी.
निधी वळवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
प्रत्येक गावात दलित वस्त्यांच्या विकास कामांचे सामाजिक लेखापरीक्षण बंधनकारक करावे.
ग्रामसभेतील मंजुरी, निधी खर्च व कामांची माहिती सार्वजनिक करावी.
१४ वा व १५ वा वित्त आयोगांतर्गत तयार करण्यात आलेल्या GPDP प्लॅनची जिल्हास्तरीय चौकशी करावी.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लवकरच जिल्हाभरातील ग्रामपंचायतींच्या GPDP प्लॅन, मंजूर निधी, पूर्ण व प्रलंबित कामे तसेच गुणवत्ता प्रमाणपत्रांची माहिती संकलित करून पत्रकार परिषदेत सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
“अनुसूचित जातींच्या हक्काच्या निधीवर डल्ला हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर तो सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांविरोधातील संघटित अन्याय आहे,” असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

Previous Post

जनतेचे लाडके नेते शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रावेर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका!

Next Post

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

Next Post

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात “काकरोज जनता पार्टी”ची युवा शक्ती आक्रमक;तरुण-तरुणींचा वाढता प्रतिसाद, यावलमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा!

May 25, 2026

राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावांमध्ये रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची ताकाळ चौकशी कराराहुरी तालुका शिवसेना प्रमुख विजय गव्हाणे यांची मागणी

May 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

May 25, 2026

खळबळजनक! डिझेल चोरी करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..अंधाराचा फायदा घेत १ जण फरार

May 25, 2026

जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जाती वस्ती विकास निधीवर डल्ला?सत्ताधारी सरपंच–ग्रामसेवकांच्या संगनमतातून दलित हक्कांवर घाला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक“दलित वस्त्यांचा निधी इतर भागात वळवणाऱ्यांवर नावानिशी गुन्हे दाखल करा”  शमिभा पाटील

May 25, 2026

जनतेचे लाडके नेते शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रावेर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका!

May 23, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..