Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 20, 2026
in क्राईम
0

स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना
सोनईचा घावटे आडनाव असलेला आणि शनिशिंगणापूरचा जाधव आडनाव असलेला असे दोघे ‘बुकी’ आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. या सुट्टेबाजीत आतापर्यंत सोनईच्या एका तरुणाचं १० लाख रुपयांचं नुकसान झालं असून या तरुणासह अनेकांची या सट्टेबाजीत आर्थिक फसवणूक झाल्याचं बोललं जात आहे. परंतू योग्य अशा मार्गदर्शनाअभावी हे सारे तरुण पोलिसांत फिर्याद देण्यासाठी अद्यापपर्यंत जाऊ शकले नाही, हेच वास्तव आहे. दरम्यान, या संदर्भात सोनई आणि शनिशिंगणापूरच्या पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजीत आर्थिक फसवणूक झालेल्या आणि या सट्टेबाजीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता आहे.

इंटरनेटवरच्या सट्टेबाजीच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन खातं (Account) तयार केलं जातं. युपीआय (UPI), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pay) किंवा नेट बँकिंगद्वारे खात्यात पैसे जमा केले जातात. मॅच सुरु असताना किंवा मॅचच्या आधी ‘मॅच कोण जिंकेल’, ‘नाणेफेक कोण जिंकेल’, ‘पॉवरप्लेमध्ये किती धावा होतील’ (सेशन) आणि ‘कोणता खेळाडू किती धावा करेल’ यांसारख्या पर्यायांवर पैसे लावले जाताहेत.

भारतात (माहिती तंत्रज्ञान आणि जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार) थेट पैशांची देवाणघेवाण करुन निकालांवर सट्टा लावणं किंवा अशा परदेशी बेटिंग ॲप्सचा वापर करणं बेकायदेशीर मानलं जातं. सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मवर आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका असतो आणि ईडी (ED) सारख्या सरकारी संस्थांकडून अशा ॲप्सवर कारवाई करुन बँक खाती गोठवल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे ईडीची अशी कारवाई सोनई आणि शनिशिंगणापूरमध्येही व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलीस कधी आवळणार ‘मास्टर माईंड’च्या मुसक्या…?

आयपीएल क्रिकेट मॅचवर लावल्या जाणाऱ्या सट्टेबाजीत आर्थिक फसवणूक झालेल्या कोणाचीच लेखी तक्रार नसल्यामुळे संबंधित ‘मास्टर माईंड’विरुद्ध कारवाई करण्यात स्थानिक पोलिसांना अडचणी येत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ज्याप्रकारे पोलीस अनेक गुन्ह्यांमध्ये स्वतः फिर्यादी होतात, त्याप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणातसुद्धा स्वतः फिर्यादी होण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पोलिसांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठं काय चाललंय, याची खबऱ्यांमार्फत पक्की खबर असते. मात्र तरीही पोलीस एखाद्याच्या लेखी तक्रारीची वाट का पाहतात, हाच खरा प्रश्न आहे. लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक होत असलेला हा सट्टेबाजीचा हा आतबट्ट्याचा खेळ खेळत आणि खेळवीत असलेल्या तरुणांच्या स्थानिक पोलीस कधी मुसक्या आवळणार, याची मात्र सर्वत्र उत्सुकता आहे

Previous Post

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..