Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 20, 2026
in क्राईम
0

स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना

हल्ली बाजारात एखाद्यानं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या दुसऱ्या एकाला हातउसने पैसे जरी मागितले तरी एकच न पटणारं कारण सांगितलं जातं. ते म्हणजे ‘बाजारात आर्थिक मंदी चालू आहे’. परंतू दुसऱ्या बाजूला आयपीएल क्रिकेट मॅचवर लावल्या जाणाऱ्या सट्टेबाजीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मग प्रश्न असा उरतो, की खरंच बाजारात आर्थिक मंदी चालू आहे का? यासंदर्भात विश्वसनीय सूत्रांमार्फत समजलेली माहिती अशी, की आयपीएल क्रिकेट मॅचवर जो सट्टा लावला जातो, त्यातून दररोज किमान ५० लाख रुपयांची उलाढाल होते. या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीचं ‘कनेक्शन’ सोनई आणि शनिशिंगणापूर असल्याचंही यानिमित्तानं बोललं जात आहे. आता हे ‘कनेक्शन’ अहिल्यानगरच्या एसपींचं

‘सुदर्शन’ चक्र खरंच भेदणार का, हीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नेवासे तालुक्यातल्या सोनईचा एक जण आणि शनिशिंगणापूरचा एक जण असे दोघे ‘बुकी’ या आयपीएल क्रिकेट मॅचवर लावल्या जाणाऱ्या सट्टेबाजीच्या खेळाचे खरे ‘मास्टर माईंड’ असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. नेवासे तालुक्यातल्या सोनई, शनिशिंगणापूर आणि घोडेगाव या तीन गावांत आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असून यातून अनेकांचे खिसे रिकामे होत आहेत तर तुरळक लोक प्रचंड ‘मालामाल’ होत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानं देशी दारु, मटका, बिंगो, तीन पत्ती जुगार, कॅरमचे क्लब असे अनेक प्रकारचे अवैध धंदे कडकडीत बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे मात्र आयपीएल क्रिकेट मॅचवर जोरदार सट्टेबाजी सुरु आहे. या सट्टेबाजीचं साम्राज्य उध्वस्त करण्यात एस. पी. मुम्मका सुदर्शन यांना यश येईल का, हेच आता पहायचं आहे.

शनिशिंगणापूरच्या एका बुकीच्या घरातून आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात आहे, अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांमार्फत हाती आली आहे. हल्ली प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. या मोबाईलच्या माध्यमातून हा सट्टा खेळवला जात आहे. शनिशिंगणापूर हे शनिभक्तांसाठी पवित्र धाम असलं तरी याठिकाणी दररोज शनिभक्तांची प्रचंड गर्दी होतेच असं नाही. महिन्यातले अनेक दिवस याठिकाणी शुकशुकाट असतो. त्यामुळे फावल्या वेळेत काय करायचं, अशी समस्या इथल्या तरुणाईला पडली. मात्र हल्लीची तरुणाई खूपच ‘स्मार्ट’ असून या समस्येवर शनिशिंगणापूरच्या काही तरुणांनी सहजपणे मार्ग काढला असल्याचं दिसत आहे. आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावायचा आणि त्या माध्यमातून लाखो रुपये कमवायचे, असा हा मार्ग आहे. दरम्यान, आयपीएल क्रिकेट मॅचवर (IPL) मुख्यत्वे अनधिकृत बुकींमार्फत ऑफलाईन किंवा 1xBet, Parimatch, Stake आणि Betway सारख्या ऑनलाइन बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सद्वारे सट्टा लावला जातो.

असा लावला जातो सट्टा…!

ऑनलाईन सट्टा लावण्याची सर्वसाधारण प्रक्रिया अशी आहे. इंटरनेटवरच्या सट्टेबाजीच्या ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन खातं (Account) तयार केलं जातं. युपीआय (UPI), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pay) किंवा नेट बँकिंगद्वारे खात्यात पैसे जमा केले जातात. मॅच सुरु असताना किंवा मॅचच्या आधी ‘मॅच कोण जिंकेल’, ‘नाणेफेक कोण जिंकेल’, ‘पॉवरप्लेमध्ये किती धावा होतील’ (सेशन) आणि ‘कोणता खेळाडू किती धावा करेल’ यांसारख्या पर्यायांवर पैसे लावले जाताहेत.

ईडीची कारवाई अपेक्षित…!

भारतात (माहिती तंत्रज्ञान आणि जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार) थेट पैशांची देवाणघेवाण करुन निकालांवर सट्टा लावणं किंवा अशा परदेशी बेटिंग ॲप्सचा वापर करणं बेकायदेशीर मानलं जातं. सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मवर आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका असतो आणि ईडी (ED) सारख्या सरकारी संस्थांकडून अशा ॲप्सवर कारवाई करुन बँक खाती गोठवल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे ईडीची अशी कारवाई सोनई आणि शनिशिंगणापूरमध्येही व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘त्या’ दोघा ‘मास्टर माईंड’ची नावं एसपींना दिली जाणार…?

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे सोनई आणि शनिशिंगणापूरचे ते दोन ‘मास्टर माईंड’ कोण आहेत, त्यांची नावं आणि आडनावं काय आहेत, ते कोणत्या राजकारणी मंडळींशी संबंधित आहेत, या सट्टेबाजीच्या माध्यमातून या दोघांनी आतापर्यंत किती ‘माया’ गोळा केली, या आणि अशा अनेक प्रश्नांची सर्वसामान्यांना प्रचंड उत्सुकता आहे. एकीकडे पैशांची चणचण भासत असल्यामुळे अनेकांना बेकायदा सावकारांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत. अर्थात यातून अनेकजण कर्जबाजारी झाले असून आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. परंतु दुसरीकडे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दिवसेंदिवस भलतेच ‘मालामाल’ होत असल्याचं दिसत आहे. हे नक्की कोण आहेत आणि हे कोणाकोणाच्या संपर्कात आहेत, याची सर्व माहिती अहिल्यानगरचे एसपी मुम्मका सुदर्शन यांना देणार असल्याची माहिती काही तरुणांनी स्वतःचं नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय.

Previous Post

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

Next Post

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..