
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामधील असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मधील गणे गावचे भूमिपुत्र व राहुरी फॅक्टरी येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी ठाणे येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब कोबरणे यांना पोलीस खात्यामध्ये अति महत्त्वाचे मानले जाणारे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने जाहीर केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक श्री बाळासाहेब कोबरने यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार लवकरच राहुरी फॅक्टरी व गणेगाव नागरिकांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती राहुरी फॅक्टरी येथील आदिशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष साई पाळंदे यांनी दिली .
श्री बाळासाहेब कोबरने यांनी आपल्या पोलीस खात्यामध्ये पंधरा वर्षाच्या सेवेच्या प्रामाणिक निष्ठावंत सेवेबद्दल व उत्कृष्ट कामगिरी बद्दल महाराष्ट्र पोलीस खात्यातील हा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला आहे .
त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे राहुरी तालुक्याची नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्याची मान उंचावली असल्याने लवकरच श्री बाळासाहेब कोबरणेयांचा भव्य दिव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे .
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आदिशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष साई पाळंदे .सर्वधर्म समभाव ग्रुपचे अध्यक्ष किरण चव्हाण .अमोल जाधव .आदेश जाधव .श्रीकांत साळवे .सिद्धार्थ तनपुरे .अक्षय भोसले .सतीश साळवे .दर्शन कोतवाल .अक्षय पाळंदे .सार्थक साळवे .आदित्य पाळंदे .करण आडगळे .पवन वैरागर .अतिश दिवे . सैराजवाघ .साईदीप मुसमाडे .पियुष जगधने .को भरणे .शिवराज मोरे आदींसह मंडळातील कार्यकर्ते सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे .






