Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार ;राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 28, 2026
in राजकीय
0

राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो!

खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पाडळी रांजणगाव शाखेच्या उदघाटनप्रसंगी खासदार नीलेश लंके यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. “मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खेळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो,” असे ते म्हणाले.

कर्जुले हर्या येथे २०२९ ची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, पाथर्डी, नगर शहर, नगर तालुका, पारनेर या मतदारसंघांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यासाठी पूर्णतः सक्षम आहे,” असे त्यांनी नमूद केले. 

पुढे बोलताना ते म्हणाले, “राजकारणात कधी कधी जाणीवपूर्वक विधान करून प्रतिक्रिया पाहावी लागते. कोण आक्रमक होतो, कोण शांत राहतो, यावरून पुढील रणनीती ठरवता येते. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलो तर कामासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे.”

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लंके यांनी “आज सत्ता नसली तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात. लढा आणि संयम ठेवा,” असा संदेश दिला. त्यांनी शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत, “पवार साहेब अनेक वर्षे विरोधात राहूनही कधी डगमगले नाहीत,” असे सांगितले.

विरोधकांवर टीका करताना लंके म्हणाले, “काहींना वाटते मी मावळलो आहे; मात्र ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारता, त्यांनाच घरी बसवण्याची ताकद माझ्यात आहे. डबक्यातल्या बेडकाला वाटते तेच जग आहे; पण बाहेरचे जग खूप मोठे आहे.”

कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “भोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. ज्यांनी काम केले नाही त्यांनी लोकांना फसवू नये,” असे त्यांनी सांगितले. तसेच “मी साधा माणूस आहे. अडचणी येतात, पण संयम ठेवून पुढे गेल्यास यश मिळते,” असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मारुती रेपाळे, सुदाम पवार, रा. या. औटी, अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, कारभारी पोटघन, सचिन पठारे, सतीश भालेकर, लाला भोंडवे, प्रकाश गुंड आदी मान्यवर उपस्थित होते

Previous Post

महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार ;राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो!

April 28, 2026

महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश

April 28, 2026

बोरखेडा खुर्द गावाजवळ नव्या पुलावर पडले मोठे खड्डे; अपघाताचा धोका वाढला

April 28, 2026

संघर्षातून यशाकडे… प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

April 28, 2026

खाद्यतेल दरवाढीचा ग्राहकांना फटका

April 27, 2026

नगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

April 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..