
जिल्हा प्रतिनिधी मन्सूर तडवी
आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर जामनेर शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि तिरडीतील सरकारच्या पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी
रासायनिक खतांच्या किमती तात्काळ कमी कराव्यात
युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत
पिक विमा मोफत दिला जावा
शेतकऱ्यांवर लादलेली स्मार्ट मिटर सक्ती मागे घेण्यात यावी
मे महिन्यात झालेल्या पंचनाम्यानंतर अद्याप मिळालेली नाही ती नुकसान भरपाई त्वरीत द्यावी
जामनेर शहरातील अतिक्रमणधारक व लोटगाडी चालकांना न्याय मिळावा
या आंदोलनात पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततापूर्वक पार पडले असून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.







