Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 23, 2026
in राजकीय
0

आहिल्यानगर :/प्रशांत बाफना महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस समोर असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. खरातनं एकीकडे महिलांचे लैंगिक शोषण करतानाच भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचंही समोर आलं आहे. याबाबत त्याच्यावर गुन्ही दाखल झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरानंतर आता खरात प्रकरणात दुसरी मोठी विकेट पडली आहे.


शिर्डी येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत भोंदूबाबा अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाते असल्याचं अढळून आलं होतं. यात रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकरणकर आणि त्यांच्या मुलाच्या खात्याचाही समावेश आहे. ज्यांच्या नावावर ही खाती आहेत, त्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.


याचदरम्यान, अशोक खरात कनेक्शनमुळे कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल अन् गैरव्यवहारावही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशातच आता समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.


काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षापासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते. पण त्यांना अशोक खरात प्रकरण भोवलं आहे.याच पार्श्वभूमीवर कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी पतसंस्थेच्या सभासदांकडून जोरदारपणे सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. या सगळ्या घडामोडीनंतर कोयटे यांनी अखेर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.


शिर्डी पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील 100 संशयास्पद खात्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रकरणात पतसंस्थेत कायदेशीर प्रक्रिया पाळली गेल्याचा दावा केला होता, मात्र, या 100 खात्यांच्या तपासामुळे समता पतसंस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाशी संबंधित रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यातून दोन कोटींच्या वर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आले असून, या खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव असल्याची माहिती आहे.

काका कोयटेंनी राजीनामा दिलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15 हजार पतसंस्था काम करत असल्याची माहिती आहे. जवळपास या फेडरेशनचे 6 हजार सभासद आहेत. कोयटे हे या फेडरेशनचे 2005 च्या पूर्वीपासून अध्यक्ष राहिले होते.


काका कोयटेंनी राजनामा दिलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15 हजार पतसंस्था काम करत असल्याची माहिती आहे. जवळपास या फेडरेशनचे 6 हजार सभासद आहेत. कोयटे हे या फेडरेशनचे 2015 च्या पूर्वीपासून अध्यक्ष राहिले होेते. मात्र, काही दिवसांपूर्वी अशोक खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला होता,


नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात राजकीय संबंध असल्याची चर्चा सुरू झाल्याने तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. खरात याच्या विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चाकणकर यांच्या खात्यांमधील मोठ्या व्यवहारांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.


प्रतिभा चाकणकर यांनी ही खाती आपली नसल्याचा दावा केला आहे. ही खाती सुरू करताना अर्जावर करण्यात आलेल्या सह्या बनावट आहेत. त्या सह्या आपण केलेल्या नाहीत. खाते व्यवहरात एकही रुपयांची आपली उलाढाल नाही. तसेच पोलिसांची कोणतीही नोटीस आपल्यापर्यंत पोहचली नाही, असेही प्रतिभा चाकणकर यांनी म्हणाल्या

Previous Post

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

Next Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

Next Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

April 23, 2026

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

April 23, 2026

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

April 23, 2026

स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण यांची निवड

April 23, 2026

जळगावचा डंका आता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत! ‘दिल पे तेरा नाम’ मधून नमन-दिव्या ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला; २४ एप्रिलला होणार ग्रँड रिलीज

April 23, 2026

वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात हैदोस; प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांची कैद्याला जबर मारहाण

April 23, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..