
यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालूक्यातील सांगावी बु येथे दि 22 जुलै रोजी महसूल मंडळ भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने व यावल रावेर मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या आदेशाने शासन आपल्या दारी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सांगावी बु येथिल ग्रामपंचायत मंगल कार्यालयात संपन्न झाले.
सांगावी बु या ठिकाणी संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानास यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची तबेत ठीक नसतांना हि गोरगरीब नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून उपस्थितीत राहून जनतेसाठी काम करणारा खरा सेवक कसा असावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या कार्यातून स्पष्ट होतांना दिसून येत असुन छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून भालोद मंडळाच्या पंचक्रोशीतील नागरिकांना महसूल विभागाकडून जिवंत सात बारा 22,ई हक्क नोंदणी ४२,म.ज.म.अ.१५५ दुरुस्ती 3,नवीन मतदान नोंदणी ४२,मतदान यादीतून मयातांचे नाव कमी 38,संजय गांधी DBT प्रक्रियाचे एकुण १३२ लाभार्थी,आरोग्य तपासणी 24,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सेवा १७,पुरवठा विभाग शिधापत्रिका वाटप १८,सेतू सुविधा अंतर्गत उत्पन्न दाखले 26,जातीचे दाखले 24,वय अधिवास रहिवासी दाखले १२,जननी सुरक्षा योजना लाभ १९,लेक लाडकी योजना ४ महिला बाल विकास योजना १६ अश्या एकंदरीत एकुण ४४३ लाभार्थ्यांना या अभियानाअंतर्गत लाभ देण्यात आला असून यावेळी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व सर्व अधिकारी वर्ग तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी,यावल तालुक्यातील भाजप पक्षाचे पदाधिकारी व विविध पक्षाचे कार्यकर्ते,सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







