Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 25, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
किनगाव :
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, रुग्णांना मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचे चित्र उघड झाले आहे. जागेच्या तीव्र अभावामुळे चक्क दोन गरोदर मातांना एकाच बेडवर सलाईन लावून उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणि सलाईन लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत धरून उपचार घ्यावे लागत आहेत. ग्रामीण रुग्णालय बंद असल्यामुळे संपूर्ण भार या छोट्याशा प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडला आहे. परिणामी, एकाच लहान खोलीत डॉक्टर व कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत.
विशेष म्हणजे, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मर्यादित साधनसामग्रीत उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान, किनगाव येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू झाले असते तर अशा अमानवी घटना घडल्या नसत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
प्रश्न उपस्थित होतो —
गरोदर महिलांच्या जीवाशी असा खेळ का?
आरोग्य व्यवस्थेची ही दुर्दशा नेमकी कोणामुळे?
ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात प्रशासन अपयशी का?
किनगावातील ही परिस्थिती म्हणजे आरोग्य व्यवस्थेवरचा मोठा कलंक ठरत असून, तात्काळ उपाययोजना न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची मागणी :
किनगाव ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करावे
प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक सुविधा व जागा उपलब्ध करून द्यावी.
आता तरी प्रशासन जागे होणार का? की एखादा गंभीर प्रसंग घडल्यावरच हालचाल होणार?

Previous Post

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

Next Post

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

Next Post

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..