
उपसंपादक मन्सूर तडवी
यावल तालुक्यातील ग्रामपंचायत परसाडे बु व समस्त ग्रामस्थ परसाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी तडवी भिल सामूहिक विवाह सोहळा सतत तिसऱ्या वर्षा पासुन, परसाडे बु, ता. यावल जिल्हा जळगाव येथे संपन्न होत आहे या वर्षी दि- 12 एप्रील 2026 ,वार- रविवार,वेळ दु- 12 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलाआहे.तरी आदिवासी तडवी भिल समाजातील इच्छुक वधू-वरांनी या योजनेचा लाभ घ्यावा.इच्छुक वधुवरांनी नाव नोंदणीसाठी खालील कागदपत्रे सोबत आणावीत.वधू व वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वधू-वर यांचे पाच पासपोर्ट फोटो, वधू-वर यांचे जातीचा दाखला, वधू- वर यांचा आधार कार्ड ,वधू -वर यांचे जात वैधता प्रमाणपत्र (असले तर ) , वधूचे वय १८ वर्षे तर वराचे वय २१ वर्षे पूर्ण असले पाहिजे. संपर्क साठी क्रमांक- सौ. मीनाताई तडवी(सरपंच) – ७०८३२५८६१६,श्री.सुलेमान तडवी (उपसरपंच) -८३९०८४७५९५, श्री. रोशन तडवी (ग्रा.प.सदस्य) -७२६३८४८७८६, श्री.नसिम तडवी- ९०४९०५८३८३,श्री.फिरोज तडवी- ९३५९६१२४९७,श्री.गफुर तडवी- ७८५५५८१२१५,श्री.अलाउद्दीन तडवी- ९३५६६५००७७*यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे







