Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

वैद्यकीय अधिकाऱ्यावर गंभीर तक्रार; विभागीय चौकशीचे आदेश

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 19, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव : आरोग्य विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र अशोक पाटील यांच्या बेकायदेशीर कामकाजाबाबत गंभीर तक्रार दाखल झाल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जळगाव यांनी अधिकृतपणे विभागीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरांविरोधात केलेल्या तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच संशय निर्माण झाला आहे.
चौकशीसाठी समिती स्थापन
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
या समितीत:डॉ. सतीश वी. टाक (अध्यक्ष)डॉ. प्रकाश ताले (सदस्य)श्री. रविंद्र अमुकर (सदस्य)यांचा समावेश असून, संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी व जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
७ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चौकशी समितीला ७ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर तक्रारीतील आरोप खरे ठरले, तर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
नागरिकांची मागणी
“सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी तीव्र मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले असून, या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

साकळी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेकडे बेफिकीरपणा; सदस्य-पदाधिकारी बनले “मालक”? नागरिकांचा संताप उसळला!

Next Post

मतदार यादी संदर्भात SIR जनजागृती विषयावर उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा श्री.भूषण अहिरे यांनी माहिती दिली

Next Post

मतदार यादी संदर्भात SIR जनजागृती विषयावर उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा श्री.भूषण अहिरे यांनी माहिती दिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..