Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विरावली विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड; गावात जल्लोष

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 10, 2026
in राजकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील विरावली येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद गोकुळसिंग पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने विरावली गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण १३ पैकी १२ संचालकांनी एकमताने प्रल्हाद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड केली.
या निवडीबद्दल रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच चोपडा-यावल मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी प्रल्हाद पाटील यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, यावलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पंडित पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर  सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य छोटू  पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग काका राजपूत, माजी सभापती राकेश फेगडे, जिनिंग व देखरेख संघाचे संचालक तेजस पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, प्रगतिशील शेतकरी कृष्णा दादा पाटील, यावल तालुका भाजपा अध्यक्ष उमेश दादा फेगडे, तालुका सरचिटणीस हिरालाल काका चौधरी व विलास काका चौधरी, दहिगावचे सरपंच देविदास नाना पाटील, साकळीचे सरपंच दीपक दादा पाटील, उंटावदचे सरपंच शशी मामा पाटील, डॉ. मिना तडवी, डॉ. राजू तडवी व सलीम तडवी यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
तसेच भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनीही प्रल्हाद पाटील यांच्या बिनविरोध निवडीचे स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
या वेळी संस्थेचे माजी चेअरमन अर्जुन माणिक पाटील, माजी चेअरमन बाजीराव माणिकराव पाटील, संचालक युवराज पंडित पाटील, पिके महाजन, संजय मोतीराम पाटील, गुलाब रघुनाथ पाटील, नरेंद्र दयाराम सोनवणे, लीलाधर सोनवणे, प्रमिला शालिक पाटील, संजीव पाटील, भावडू पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, सुकलाल आप्पा पाटील, मुकुंदा काका भालेराव, पवन पाटील, गिरीश पाटील, शरद भाऊ राजपूत, जयेश यशवंतराव पाटील, सुभाष रघुनाथ पाटील, बादशहा पाटील, सागर भाऊ पाटील, माधव पाटील, बापू शांताराम पाटील, धनराज गोकुळ पाटील, नाना गोकुळ पाटील, नथू अडकमोल, मेहबूब काका तडवी, नामदेव मगन पाटील, सुपडू मेंबर तडवी, कैलास राजधर पाटील, गोरख आधार पाटील, अनिल पाटील, सचिन पाटील, कल्पेश राजेंद्र पाटील, रणधीर पाटील, रिंकू पाटील, तेजपाल गोकुळसिंग पाटील, योगेश अजब सिंग पाटील, दिलीप फुलपगारे, नितीन मामा पाटील, सुभाष नंदलाल पाटील, पितांबर निळे, जयेश पाटील, बडू किशन पाटील, युवराज गोकुळ पाटील, गोलू फुलपगारे, मनीष पाटील, बंटी तडवी, सचिव साळवे आप्पा तसेच निवडणूक निर्णय अधिकारी पाटील साहेब उपस्थित होते.
दरम्यान, प्रल्हाद पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा आनंद व्यक्त करत विरावली गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला, तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.
नवीन चेअरमन म्हणून प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीमार्फत शेतकरी व सभासदांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

साकळी ग्रामपंचायतीत ग्रामसभा फक्त कागदोपत्री?नागरिकांची दिशाभूल करून तहकूब ग्रामसभेवर सह्या घेतल्याची चर्चा; ग्रामसभेचा प्रचारच नाही!

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..