Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खळबळजनक: सातपुड्याच्या कुशीत ‘भुताटकी’ शाळा? ४०० विद्यार्थी कागदावर, वर्गात मात्र शुकशुकाट!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 10, 2026
in शैक्षणिक
0

शासकीय निधीचा कोट्यवधींचा अपहार; मोहमांडली आश्रमशाळेचा ‘काळा’ कारभार चव्हाट्यावर

​जळगाव/रावेर (विशेष प्रतिनिधी):
सातपुडा पर्वत रांगेच्या दुर्गम भागात वसलेल्या रावेर तालुक्यातील मोहमांडली येथील एका शासकीय अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “विद्यार्थी देवो भव:” म्हणण्याऐवजी “निधी देवो भव:” असे म्हणत या शाळेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कागदोपत्री ४०० विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवून प्रत्यक्षात वर्गात एकही विद्यार्थी हजर नसल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे.

*​निवासी शाळेचा ‘बनाव’; विद्यार्थी गायब, अनुदान मात्र सुरू!*

​मिळालेल्या माहितीनुसार, ही आश्रमशाळा निवासी असून येथे साधारण १२५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वास्तव्यास असल्याचा बनाव आश्रमशाळा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता येथे एकही विद्यार्थी राहत नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या नावाने येणारे रेशन, गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि निवास भत्ता नक्की कोणाच्या खिशात जातोय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

​ *मुख्याध्यापकांचा ‘अदृश्य’ कारभार*
​शाळेचे मुख्याध्यापक वर्षभर एकही अधिकृत रजा न घेता कर्तव्यावर गैरहजर असतात, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. शाळेत शिक्षक नाहीत, मुख्याध्यापक नाहीत आणि विद्यार्थीही नाहीत; मग ही शाळा नेमकी चालते कोणासाठी? हा केवळ निष्काळजीपणा नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला उघड दरोडा आहे. शाळेत उपस्थित कर्मचाऱ्यांना हालचाल रजिस्टर ची मागणी केली असता ती दाखवण्यास साफ नकार देण्यात आला
​ *कोणत्या कायद्यांचे उल्लंघन आणि संभाव्य गुन्हे?*
​या प्रकरणात केवळ प्रशासकीय चूक नसून खालील कायद्यांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे दिसून येते:

​१. भारतीय न्याय संहिता पूर्वीचे IPC ४२०, ४०९, ४६७
​कलम ४२० (फसवणूक) शासनाची खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे.
​कलम ४०९ शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे.
​कलम ४६७/४६८ खोटा हजेरी पट (मस्टर) तयार करणे.

​२. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा
​लोकसेवक पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवणे हा या कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो.

​३. शिक्षण हक्क कायदा
​विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा न देता केवळ कागदावर शाळा चालवणे हे बालकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे.
​होऊ शकणारी कठोर कारवाई
​चौकशीअंती दोष सिद्ध झाल्यास संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षक आणि व्यवस्थापनावर खालील कारवाई होऊ शकते:

*निलंबन व बडतर्फी:* संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकते.आर्थिक अपहार आणि फसवणुकीप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होऊ शकते.
आजवर लाटलेले कोट्यवधींचे अनुदान व्याजासह वसूल करण्याचा अधिकार शासनाला आहे. या प्रकाराविषयी दैनिक हॅलो बातमीदार च्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी स्वतः शहानिशा करूण  आश्रम शाळेला लागून असलेल्या तीनही गावात जाऊन पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून ही संपूर्ण माहिती गोळा केली आहे तसेच या प्रकरणाचा शासनाने गंभीर विचार केला नाही तर आपण याविषयी आपला लढा चालू ठेवू असे मत व्यक्त केले आहे.

Previous Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? जळगाव जिल्ह्यात बोगस लाभार्थी दाखवून लूट रुग्णालयांच्या चौकशीची मागणी

Next Post

साकळी ग्रामपंचायतीत ग्रामसभा फक्त कागदोपत्री?नागरिकांची दिशाभूल करून तहकूब ग्रामसभेवर सह्या घेतल्याची चर्चा; ग्रामसभेचा प्रचारच नाही!

Next Post

साकळी ग्रामपंचायतीत ग्रामसभा फक्त कागदोपत्री?नागरिकांची दिशाभूल करून तहकूब ग्रामसभेवर सह्या घेतल्याची चर्चा; ग्रामसभेचा प्रचारच नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

March 10, 2026

भिंगारमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी ; पाच जण जखमी

March 10, 2026

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

March 10, 2026

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

March 10, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

March 10, 2026

विरावली विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड; गावात जल्लोष

March 10, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..