Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” आमोदे येथे उत्साहात; शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 8, 2026
in शासकीय
0

यावल प्रतिनिधी : राहुल जयकर

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” दिनांक 07 मार्च रोजी आमोदे, ता. यावल येथे उत्साहात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन जळगावचे उपजिल्हाधिकारी (महसूल) विजय ढगे यांच्या हस्ते तसेच यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आला. पुरवठा शाखेमार्फत 142 नवीन व दुबार शिधापत्रिका मंजूर करण्यात आल्या. संगायो शाखेमार्फत 327 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 99 हयात प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच 12 नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले.

सेतु शाखेमार्फत 242 उत्पन्न दाखले, 71 राष्ट्रीयत्व दाखले, 69 रहिवासी दाखले, 26 जातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच 21 आधार नोंदणी व 55 आधार दुरुस्त्या करण्यात आल्या.

पंचायत समितीमार्फत 2 जलतारा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बालविकास विभागाकडून 6 लाभार्थ्यांना बेबी किट देण्यात आले. तालुका आरोग्य विभागामार्फत जननी सुरक्षा योजना – 8 लाभार्थी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – 4 लाभार्थी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – 11 लाभार्थी, तसेच संजय गांधी योजना – 46 लाभार्थी यांना लाभ देण्यात आला.

कृषी विभागामार्फत फळबाग लागवड योजनेचा लाभ 2 शेतकऱ्यांना देण्यात आला, तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ 1 लाभार्थ्याला देण्यात आला.

शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. या शिबिरास सुमारे 500 ते 600 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली. शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा उद्देश या शिबिरातून साध्य झाला.

यावेळी उपजिल्हाधिकारी विजय ढगे व तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई (मंडळ अधिकारी, बामणोद) यांनी केले तर नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

अंबरनाथ तहसील कार्यालयात सत्यप्रत (अटेस्टेड) देण्यास नकार; शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महिला संघटनेचा संताप कारवाईची मागणी

Next Post

जाहिरातींच्या टार्गेटखाली पत्रकारिता गुदमरतेय;संपादक-पत्रकारांवर होणारा अन्याय थांबवा……?

Next Post

जाहिरातींच्या टार्गेटखाली पत्रकारिता गुदमरतेय;संपादक-पत्रकारांवर होणारा अन्याय थांबवा……?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड! लाईट-पाणी नाही, डॉक्टर नाहीत… तरी ९ कर्मचाऱ्यांचे पगार सुरू; लोकप्रतिनिधींचे मौन का?

March 9, 2026

ग्रामीण आरोग्यसेवेसाठी MBBS डॉक्टरांनी पुढे यावे; जनतेची अपेक्षा तीव्रग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार देण्यासाठी सरकारी दवाखान्यांत सेवा देण्याचे आवाहन

March 9, 2026

“कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज कामासाठी भटकंती; सरकारने तात्काळ सन्मानपूर्वक रोजगार द्यावा!”

March 9, 2026

जाहिरातींच्या टार्गेटखाली पत्रकारिता गुदमरतेय;संपादक-पत्रकारांवर होणारा अन्याय थांबवा……?

March 8, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” आमोदे येथे उत्साहात; शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

March 8, 2026

अंबरनाथ तहसील कार्यालयात सत्यप्रत (अटेस्टेड) देण्यास नकार; शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महिला संघटनेचा संताप कारवाईची मागणी

March 8, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..