
यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल भाजपा मंडळ यांच्या तर्फे यावल खरेदी विक्री संघात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावल येथिल भाजपा मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला असुन वाढदिवसाच्या निमित्ताने फैजपूर येथिल संजीवनी ब्लड बँक च्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते यांनी रक्तदान करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य हिराभाऊ चौधरी,यावल तालुका चिटणीस विलास चौधरी, तालुका उपाध्यक्ष उज्जेन सिंग राजपूत, भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपचे पदाधिकारी डॉ. कुंदन फेगडे, भरत पाटील, नितीन महाजन, बाळू फेगडे, रितेश बारी, व्यंकटेश बारी, कोमल इंगळे, पूनम पाटील, शाम महाजन, पिंटू कोळी, सागर चौधरी, अनिकेत सरोटे, यावल खरेदी विक्री संघांचे व्हा चेरामन अतुल भालेराव, चेअरमन पांडुरंग सराफ, तेजेस पाटील, यांच्या सह भाजपा कार्यकर्तेच्या उपस्थित एकुण 43 रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेतला.







