जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी महिला सेनेच्या शाखाध्यक्षपदी अनिता कापुरे, तर उपशाखाध्यक्षपदी लक्ष्मी भिल यांची निवड करण्यात आली. दरम्यान ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या भाषणात महिला शाखेच्या कार्याचे कौतुक केले आणि हरीविठ्ठल नगर मधील कार्यालय हे परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या कार्याला बळ देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले यांनीही उपस्थित राहून मनसेची भूमिका, कार्यपद्धती आणि जनतेसाठीचे ध्येयधोरण स्पष्ट केले.
या प्रसंगी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाकभाई सय्यद, ॲड. सागर शिंपी, साजन पाटील, सतीश सैंदाणे, संदीप मांडोळे, दीपक राठोड, पंकज चौधरी, ऐश्वर्या श्रीरामे, अनिल दिघे, अविनाश जोशी, राहुल चव्हाण, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, तसेच आशुतोष जाधव, रोहिदास मिस्तरी, खुशाल ठाकूर, निलेश खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले. सूत्रसंचालन ललित शर्मा व श्रीकृष्ण वेगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी केले.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी ही विनंती.