Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कोतवाली पोलिसांचा दणका..! सराईत गुंड ६ महिन्यांसाठी तडीपार..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 12, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर (प्रशांत बाफना):-नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुंडावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुंड फेजान फिरोज शेख उर्फ दसकिलो (वय ३०,रा.राज मेडिकलजवळ,रामचंद्र खुंट) यास तब्बल सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे.फेजान शेख याच्यावर नागरिकांना हाणामार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, हत्या करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करणे,दंगा करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक चौकशी व सुनावणीनंतर संबंधित प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी फेजान शेख यास ताब्यात घेऊन दि.१० जानेवारी रोजी तडीपारीची कारवाई अंमलात आणली. या निर्णयामुळे शहरातील गुन्हेगारी वातावरणावर नियंत्रण येण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,पोलीस अंमलदार संतोष बनकर,दौंड,वसीम पठाण,शाबीर शेख,विशाल दळवी,विनोद बोरगे, अविनाश वाकचौरे,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अभय कदम,अमोल गाडे,सचिन लोळगे, सुरज कदम,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महिला पोलीस अंमलदार दरंदले,कांबळे,अतुल काजळे,याकूब सय्यद,राम हंडाळ,अतुल लाटे, सोमा केकाण,दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस राहुल गुंडू यांनी केली आहे.या कठोर कारवाईमुळे नगर शहरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून,भविष्यातही अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे

Previous Post

साकळी येथे आजपासून अखंड हरिनाम संकिर्तन व श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताहास सुरुवात गावात भक्तीमय वातावरणसप्ताहाचे यंदा २१ वे वर्ष

Next Post

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ; बँकेच्या ‘त्या’ संचालकांना दणका

Next Post

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ; बँकेच्या ‘त्या’ संचालकांना दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..