
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
केंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांचा साकळी येथे नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करणारे सलीम पिंजारी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल साकळी ग्रामस्थांत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
सत्कारप्रसंगी माजी उपसरपंच मुसेखा ईसेखान, माजी उपसरपंच वासिम खान (हाजी आसिफ खान), माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अहमद सैय्यद मीरा, ग्रामपंचायत सदस्य बाबा मेंबर, सलीम शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्फराज तडवी, नसीर खान, वझीर खान, शाहरुख खान, साबीर शेख, अकील शेख, रफिक शेख, रफिक खान, अमीर खान, अल्ताफ खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सलीम पिंजारी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मानवाधिकार संरक्षणाच्या कार्यात ते अधिक प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यामुळे साकळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.







