Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

घुसखोरांना शोधून डिपोर्ट करू, चेन्नइत महापौर जसा तमिळ, तसा मुंबईचा महापौरही मराठी, हिंदूच!- मुख्यमंत्री फडणवीस

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 8, 2026
in राजकीय
0

मुंबई: /प्रशांत बाफना मुंबईचा महापौर कोण असावा यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल! ” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले. फडणवीस यांनी हिंदुत्व, मराठी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आजतकच्या एका वाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बीएमसीच्या महापौरपदी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्यांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे रक्त आहे आणि जे त्यांच्या विचारांवर चालतात, ते सर्व मराठी आहेत. तसेच बाहेरून आले म्हणून काय झाले, जे इथे स्थायिक झाले आहेत ते सर्व मुंबईकर आहेत, मग त्यांची भाषा हिंदी असो. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि हिंदुत्व हाच आमचा आत्मा आहे.

दरम्यान, अवैध घुसखोरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री आक्रमक झाले. “ आम्ही केवळ बोलत नाही, तर कृती करतो. बांगलादेशी घुसखोरांना डिपोर्ट (देशातून बाहेर काढणे) करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येणार्‍या काळात एकाही बांगलादेशी घुसखोराला मुंबईत राहू देणार नाही, त्यांना वेचून बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईच्या विकासाबद्दल बोलताना फडणवीसांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, आम्ही घरांची डिलिव्हरी सुरू केली असून नवीन डेव्हलपर्सना संधी दिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या 7 ते 8 वर्षांत मुंबई पूर्णपणे स्लम फ्री (झोपडपट्टीमुक्त) होईल. पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी 100 टक्के पंपिंग स्टेशनमध्ये काम युद्धपातळीवर सुरू असल्याचंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर निशाणा: “ उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्पात योगदान देण्यास नकार दिला होता, तेव्हा आम्ही एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे पूर्ण केली. एमएमआरडीएने बीएमसीच्या कोणत्याही अधिकारावर गदा आणलेली नाही, उलट मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे. या व्यतिरिक्त एमएमआरढीएने कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. असे म्हणत बीएमसी संपवण्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले.

Previous Post

बीड हादरलं: दिवसाढवळ्या गोळीबार, धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; आरोपी फरार

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचा गारखेडा येथे आनंदात समारोप

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचा गारखेडा येथे आनंदात समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..