
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
साकळी येथील हजरत सजन शाह वली यांच्या पवित्र उरूसास मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात सुरुवात झाली असून परिसरात श्रद्धेचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे. उरूसाच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी उसळली असून दूरदूरच्या गावांमधून हजारो भाविक दाखल होत आहेत.
उरूसदरम्यान भक्तांनी आपल्या मन्नती पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात नजराणे अर्पण केले आहेत.
मेढा तुला – 17 जिलेबी तुला – 29
गूळ तुला – 13 साखर तुला – 11
अशा स्वरूपात मन्नती चढविल्या जात असून, श्रद्धेचा हा अद्भुत सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाच रविवार चालणारा उरूस – श्रद्धेची परंपरा जिवंत!
साकळी येथील हा उरूस सलग पाच रविवार भरत असतो. विशेष म्हणजे दुसऱ्या रविवारी उरूसाच्या मुख्य दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. दर्गा परिसर फुलांनी, रोषणाईने व भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
धार्मिक विधी, कव्वाली व सेवा कार्याचा संगम उरूसादरम्यान चादर चढवणे, फातिहा, दुआ, कव्वाली तसेच अन्नदान व सेवा कार्य मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा उरूस सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश देत आहे.
श्रद्धा, एकता आणि परंपरेचा गौरवशाली उत्सव सजन शाह वली उरूस केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा, विश्वास आणि भाईचाऱ्याचे प्रतीक ठरत आहे. उरूसाच्या पुढील रविवारीही भाविकांची आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण कायम आहे.
या पवित्र उरूसामुळे साकळीचे नाव पुन्हा एकदा श्रद्धा व संस्कृतीच्या नकाशावर उजळून निघाले आहे.







