
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची घोडदौड थांबवणे अशक्य होत चालले आहे! राज्यभर मिळत असलेले अभूतपूर्व यश, सत्तेकडे ठामपणे सुरू असलेली वंचितांची वाटचाल आणि उमेदवार मुलाखतींसाठी उसळलेली प्रचंड गर्दी हे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्पष्ट, निर्भीड आणि लोकाभिमुख ध्येय-धोरणांचेच फलित आहे.
याच प्रभावातून प्रेरणा घेत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत वंचित बहुजन युवा आघाडीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
हा ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रम वंचित बहुजन युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
मनसेतील दिग्गजांचा वंचितमध्ये प्रवेश या वेळी मनसेचेशहर संघटक अमोल विधाते,उपविभाग अध्यक्ष नवनाथ हटकर,प्रथमेश घाटबाळे, करण विधाते, विशाल येडकर,प्रशांत राजपूत, प्रेम पोटफोडे, सुनील भिसे,सचिन महापुरे, विशाल राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
प्रमुख नेत्यांची दमदार उपस्थिती
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे,
औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे,युवा आघाडी जिल्हा महासचिव सतीश शिंदे,युवा आघाडी पूर्व शहराध्यक्ष अफसर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी या जाहीर प्रवेशामुळे औरंगाबादच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून मनसेला जबर धक्का बसला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे.
वंचितांची सत्ता, बहुजनांचा आवाज आणि नव्या राजकारणाची सुरुवात—याच दिशेने महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत आहे!







