
विकासाच्या कामांचा झंझावात
वाळकी गटाची स्वतंत्र ओळख
विकास कामांच्या जोरावर वाळकी गट ‘एक नंबर’
खासदार नीलेश लंके यांची तुफान फटकेबाजी
आहिल्यानगर : प्रशांत बाफना
जिल्हा परिषद वाळकी गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावत गटाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात आली असून, विकासाच्या जोरावर हा गट ‘एक नंबर’ ठरला आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
५२ लाखांच्या शाळा
वडगाव तांदळी येथे ५२ लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या व अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार लंके बोलत होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
ग्रामीण शिक्षणासाठी भौतिक सुविधा
खासदार लंके म्हणाले, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शाळांच्या भौतिक सुविधा वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. दर्जेदार शिक्षणासाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली
वाळकी गटात विकासाची घोडदौड
वाळकी गटामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, शाळा खोल्या, समाजमंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, नदी खोलीकरण, अंगणवाडी व आरोग्य सुविधा यांसारखी अनेक विकास कामे बाळासाहेब हराळ यांच्या पुढाकारातून मार्गी लागली आहेत. या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचे लंके यांनी नमूद केले.
दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा डाव
यावेळी बाळासाहेब हराळ म्हणाले, वाळकी गटात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन विरोधक करत असून, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा डाव नागरिकांनी ओळखला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम विरोधक करत आहेत. शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा या क्षेत्रात प्राधान्य देत गटाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न
प्रताप शेळके म्हणाले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना जिल्ह्यातील शाळा खोल्या मंजूर करण्यात आल्या. विकासाचा ठोस मुद्दा नसल्यामुळे विरोधक दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
मान्यवरांची उपस्थिती
या लोकार्पण कार्यक्रमास कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश ठोंबरे, गणेश पिंपळे, शहाजी रणसिंग, सतिष ठोंबरे, उपसरपंच रामदास ठोंबरे, रणजित रणसिंग, जालिंदर पिंपळे, रामदास पिंपळे, अमर रणसिंग, रमेश दळवी, राजेंद्र ठोंबरे, मोसीम शेख, राहुल गलांडे, संभाजी पिंपळे, पोपट पिंपळे, कानिफ पिंपळे, सचिन घोंगडे, नवनाथ पिंपळे, संतोष पिंपळे, योगेश घिगे, हनुमंत घालमे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







