
अहिल्यानगर/प्रशांत बाफना
शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत माया अरुण मुंढे व विद्या अरुण लांडे यांच्यात सरळ लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत माया अरुण मुंढे यांनी ६,५९१ मते मिळवून विजय मिळविला. त्यांच्याविरोधात विद्या अरुण लांडे यांना ६,५०५ मते मिळाली. तसेच रत्नमाला महेश फलके यांना ५,४४१, तर परवीन एजाज काझी यांना ५,४३८ मते मिळाली.
या निवडणुकीत एकूण २४ नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधित्व दिसून आले. निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
विनोद मोहिते, ६५३ (भाजप), ज्योती लिंगे ७४२ (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवानी काथवटे,७७० (शिवसेना), नितीन दहीवाळकर,७३५ भाजपा
रिजवान शेख,९४९ (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), उज्ज्वला मुंढे, ७१० (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), गीता लांडे,७५४ (भाजप), आशुतोष डहाळे,७५९ (शिवसेना – शिंदे गट), कैलास तिजोरे,८१२ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सलमाबी कुरेशी,६३९ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), अमर पुरनाळे, ८७९ (शिवसेना – शिंदे गट), गांधी दीप्ती,७०६ (भाजप), परवीन शेख, ७३० (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), वजीर पठाण,८२० (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), निलेश रोकडे,१११० (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), साधना लांडे,११५६ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सुवर्णा मगरे,५४२ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), संतोष जाधव,५०० (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), तृषा भारस्कर१०९२ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सिराज पटेल,१०१६ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), सविता फडके,१५०० (भाजप), सुनील काकडे,१४०९ (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), आशा बुलबुले,१३०१ (भाजप) आणि सागर फडके,११९५ (भाजप).
दरम्यान, शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार मोनिका राजळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या नातेवाईकाला उमेदवारी देण्याचा हट्ट धरल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली आणि त्याचा फटका थेट निवडणूक निकालावर बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दखल घ्यावी, अशी मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे







