
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: मा.मंत्री गिरीश महाजन,नेते, पुढारी, अध्यक्ष,महा,नगर पालिका आयुक्त, वनसंरक्षक,इ.यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत झालेल्या विषयावर सर्वांचे एकमत ठरत घेलेल्या नाशिकच्या हरित क्षेत्राचा नवा उच्चांक स्थापन करण्यासाठी ‘हरित नाशिक’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत आज भोईर मळा, मखमलाबाद रोड येथे भव्य वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध देशी प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. अध्यात्मिक वैभवाची भूमी अशी आपल्या नाशिक शहराची जगभरात ओळख आहे, आता नैसर्गिक वैभवाची भूमी अशी ओळख ही निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे, यात आपल्याला नक्कीच यश मिळेल हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी मा, मंत्री गिरीश महाजन,आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार सौ. देवयानी फरांदे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त श्री. शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर, उपवनसंरक्षक श्री. सिद्धेश सावर्डेकर यांच्यासह महंत हरिगिरीजी महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, शंकरानंद महाराज, जनार्दन हरी महाराज, स्वामी भागवतानंद आदी उपस्थित होते.







