
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड सुरू असून, हा प्रकार म्हणजे थेट पर्यावरणाचा खून आहे. झाडे तोडली जात आहेत, पण त्याऐवजी झाडे लावण्याचे केवळ कागदी दिखावे सुरू आहेत. शासन, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप आता जनतेतून होत आहे.
** वृक्षतोड म्हणजे आपत्तीला खुले निमंत्रण**
वाढते तापमान, अनियमित पावसाळा, दुष्काळ, पूर, हवेचे प्रदूषण, पाण्याची टंचाई—या सगळ्यांचे मूळ कारण म्हणजे अंधाधुंद वृक्षतोड. एक झाड तोडले की अनेक पिढ्यांचे भविष्य धोक्यात येते, हे सत्य प्रशासनाला कधी कळणार?
** परवानगी नसलेली वृक्षतोड थांबवणार कोण?**
रातोरात झाडे तोडली जातात, जंगल संपवले जाते, आणि कारवाईच्या नावाने केवळ चौकशीचे नाटक होते. दोषींवर कठोर कारवाई ऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आता पर्यावरणप्रेमी नागरिक देत आहेत.
** कठोर निर्बंध आणि शिक्षा आवश्यक**
परवानगीशिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत
मोठ्या प्रमाणावर दंड व कारावासाची शिक्षा द्यावी.
प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात किमान १० झाडे लावणे बंधनकारक करावे.
वृक्षतोड प्रकरणांवर स्वतंत्र पर्यावरण न्यायाधिकरण स्थापन करावे
निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा!
आज जर वृक्षतोड थांबवली नाही, तर उद्या श्वास घ्यायलाही हवा शिल्लक राहणार नाही. शासनाने तात्काळ कठोर निर्णय घेऊन वृक्षतोड करणाऱ्यांवर निर्बंध घालावेत, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे!







