
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: शहरातील जुन्या पंचायत समितीची इमारत पाडून त्या जागी नव्या सुसज्ज पशु चिकित्सलयाचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते काम आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकले असून खाजगी कॉन्ट्रॅक्टर आणि ठराविक अधिकाऱ्यांवर मलिदा लादण्याची आरोप चर्चेत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हे बांधकाम सुरू असून कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर होत आहे. यातील महत्त्वाचा प्रश्न असा की.? जळगाव जिल्ह्यातील रेतीचे सर्व ठेके सध्या बंद असतानाही या बांधकामासाठी लागणारी रेती नक्की कुठून येत आहे.?
संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर परिस्थिती अधिकच गोंधळात टाकणारी ठरली आहे.सार्वजनिक बांधकाम व विभागातील अधिकारी नायब तहसीलदार आणि सर्कल अधिकारी या तिघांनी या रेती संदर्भात परस्परविरोधी आणि उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत त्यामुळे प्रशासन ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय नागरिकांमध्ये अधिक बळावला जात आहे.
दरम्यान रेती धुळे जिल्ह्यातून कायदेशीर मार्गाने आणली जात आहे की जळगाव जिल्ह्यातूनच अवैधपणे रॉयल्टी न भरता रेतीची तस्करी सुरू आहे याबाबत मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैद्य रेती वापर आर्थिक अनियमितता आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
आता प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कार्यवाही करते की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेले बांधकामाच्या ठिकांची सविस्तर चौकशी होऊन योग्य ती माहिती समोर आणण्याची मागणी होत आहे.







