
उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद तालुका चोपडा दिनांक १६ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या अनुभव आधारित सरपंच शक्ती, सरपंच संवाद, क्वालिटी कौन्सिल, ऑफ इंडिया द्वारे महिला सरपंच प्रशिक्षण शिबिरासाठी देशभरातून पन्नास सरपंचांची निवड करण्यात आलेली आहे त्यात महाराष्ट्रातून एकमेव जळगाव जिल्ह्यातील मोहरद तालुका चोपडा येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच अंजुम रमजान तडवी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा तालुक्यात तून परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की चोपडा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री एन आर पाटील साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम ग्रामविकास अधिकारी श्री पंकज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आपल्या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर पुढे कसे नेता येईल आणि सरपंच संवाद उपक्रमाद्वारे उपलब्ध असलेल्या संधीच्या प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल यासाठी खास परिचय सत्र आयोजित करण्यात आले आहे सरपंच संवाद उपक्रमाद्वारे देशातील सरपंचांना भक्कम साथ देऊन ग्राम विकास अधिक सक्षम करण्याकरिता या सत्रात सरपंच संवाद प्रभावी शासन आगामी विकासासाठी सरपंचांना प्रभावी शासन आगामी विकासासाठी सरपंचांना कशी मदत होईल यावर भर देण्यात आला आहे ४ दिवसीय प्रशिक्षणात मुख्य आकर्षण म्हणजे एक अनुभव आधारित त्यांनी दोन संसद भवन व गतिशक्ती संग्रहालय भ्रमण महिला विकासासाठी असलेल्या योजना यांची माहिती केंद्रीय मंत्री व राजनेता यांच्याशी संवाद अशा प्रकारे चार दिवसीय सत्राचे आयोजन करण्यात आले आहे सरपंच अंजुम तडवी ग्रामविकास आणि पंचायत राज यामध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये महिलांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात आहे त्याच बरोबर महिला शक्ती करण्या करिता लगातार अभियान चालवले जात आहे हे सरपंच संवाद शिबिर महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी असून निश्चितपणे या शिबिरातून महिलांच्या विकास आणि ग्रामविकास यांची माहिती मिळवून ती माझ्या पंचायतीच्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल महाराष्ट्र मधून फक्त महिला सरपंचाची निवड झालेली नसून सर्वच महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत महिलांशी संवाद बचत गट सातत्याने मोहिम राबविल्या जात आहेत.
या प्रशिक्षण शिबिरात पंचायतमधील महिलांच्या उन्नती आणि विकासा संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. निश्चितच या शिबिरातून त्यांना अनेक महत्त्वपूर्ण माहिती आणि कौशल्ये मिळणार असून त्याचा लाभ त्यांच्या ग्रामपंचायत मधील महिलांना मिळेल, असेही अंजुम तडवी म्हणाल्या गेल्या वर्षी पण पंचायत से पार्लमेंट तक या कार्यक्रमात राष्ट्रपती यांना भेटण्याची संधी मिळाली होती.







