
लोकांमध्ये संतापाची लाट “शासनाच्या आदेशाची वाट? की संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव?”
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजपुर्नघटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासारखा राष्ट्रीय महत्त्वाचा दिन असताना साकळी ग्रामपंचायतीने एकही कार्यक्रम, अभिवादन, मानवंदना, श्रद्धांजली यापैकी काहीही आयोजित न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
गावातील नागरिक, विचारवंत, बौद्ध उपासक यांनी या प्रकाराविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर सर्रास टीकेची झोड उठली आहे.
“आदेशाची वाट पाहणारी ग्रामपंचायत… संवेदनशीलतेचा अभाव की अनास्था?”
स्थानिक नागरिकांचा प्रश्न
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवसासाठीही शासनाच्या आदेशाची वाट पाहावी लागते का?
हातात सत्तेची शिकस्त आणि मनात संवेदनशून्यता अशीच का आहे साकळी ग्रामपंचायत?”
गावातील विविध संस्था, सामाजिक संघटना, युवकांनी आपापल्या पातळीवर महापरिनिर्वाण दिन साजरा केला. मात्र ग्रामपंचायतीचा अधिकृत कार्यक्रम मात्र शून्य!
यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर “दुर्लक्ष”, “असंवेदनशीलता” आणि “कर्तव्यच्युती”चे आरोप होत आहेत.
गावातील नागरिक संतप्त: “या ग्रामपंचायतीला जाग कधी येणार?”
लोकांचे सरळ शब्दांत मत:
“आंबेडकरी विचारांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.”
“साकळी ग्रामपंचायत जागी होणार कधी?”
“फक्त शासन आदेशाची वाट पाहून कर्तव्य झुगारून चालणार नाही.”
समाजाच्या भावनांचा अनादर ग्रामपंचायतीविरोधात कारवाईची मागणी
ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे या गंभीर दुर्लक्षाची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.







