
खिर्डी बुद्रुक ता.रावेर ।
प्रतिनिधी: उमेश तायडे
येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दिनांक ३/११/२०२५ वार बुधवार रोजी छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने फॅमिली हेल्थ कार्डाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी खिर्डी बुद्रुक येथील उपसरपंच तथा प्रभारी सरपंच साहेब अतुल पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या वाटप केलेल्या कार्ड मुळे जिल्ह्यतितील व गावातील शेतकरी, मजूरवर्ग व गरजू नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलांमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यात ओपीडी, आईपीडी, ऑपरेशन, एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणी, अति दक्षता, बालरोग तज्ज्ञ, स्त्रि-रोग तज्ज्ञ, दंत रोग तज्ज्ञ, नेत्र विकार तज्ज्ञ, आदींना समाविष्ट करण्यात आले आहे. फॅमिली हेल्थ कार्डचे सभासद नोंदणी शिबिर नुकतेच खिर्डी बुद्रुक येथे घेण्यात आले. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस. आरके, क्षेत्र अधिकारी सौ. सविता एस. पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सौ. मनीषा के. साळवी ग्रा.पं.क्लार्क डिगंबर कोळी, शिपाई राहुल कोळी,ग्रामरोजगार सहाय्यक उमेश तायडे व लाभार्थी राजधर भालेराव ,ज्ञानेश्वर महाजन,व बरेस गावातील नागरिक उपस्थित होते.*







