
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
साकळी – दिनांक 6 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, साकळी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम अत्यंत शांत, सुसंस्कारित आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश आनंता चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. यानंतर सर्व उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व कार्यांना उजाळा देत त्यांचे योगदान स्मरण केले.
या प्रसंगी उपस्थित होते.
आरोग्य निरीक्षक नितिन वाळूज,
कनिष्ठ सहाय्यक रज्जाक देशपांडे,
आरोग्य सेविका सौ. रमा पवार,
गटपरिवर्क लीना पाटील,
आरोग्य सेविका मनिषा तायडे,
आरोग्य सेवक सल्लाउद्दीन शेख,
आरोग्य सेवक मकरंद निकुंभ,
आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ,
आशा कार्यकर्त्या रीना तडवी, संगीता महाजन, सुनिता पाटील,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा ताई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम अधिक भावपूर्ण पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांना पुन्हा अधोरेखित करणारा हा उपक्रम साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राने यशस्वीरीत्या पार पाडला.







