
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)
विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य, सर्वांगीण विकास आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी, दर्जेदार शिक्षण, मेहनती शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यासोबतच, सामूहिक सामाजिक प्रयत्नांची आवश्यकता आहे शैक्षणिक जागृतीसाठी सामाजिक जागृती आवश्यक आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ औपचारिक शिक्षण देणे नाही, तर एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि हे सर्व सक्रिय सामाजिक सहकार्यानेच शक्य होईल हे विचार आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सय्यद जाकीर अली यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा,नगरदेवळा, तालुका पाचोरा येथे आयोजित सत्कार समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआनचे पठण आणि नातेपाक ने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस.एस.के. पवार हायस्कूल,नगरदेवळा येथील शिक्षक सय्यद जाकीर अली हे होते. कलीम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना शेख जावेद रहीम यांनी मांडली.या दरम्यान,विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाषणांच्या माध्यमातून शिक्षकांचे स्थान, जबाबदाऱ्या आणि सेवांवर प्रकाश टाकला. मागील महिन्यात सय्यद जाकीर अली आणि शेख कलीम यांना आदिल शाह फारुकी फाउंडेशन, जळगाव तर्फे ‘आदर्श शिक्षक’ हा सन्मान मिळाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती नगरदेवळा यांच्या माध्यमातून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.कार्यक्रमात सादिक शेख, एहतेशाम शेख, इक्बाल शेख यांनी आपले मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सादिक बिस्मिल्लाह यांनी बदलत्या परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाच्या नवीन पद्धती अवलंबण्याचे आवाहन शिक्षकांना केले. त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन (सर्चस्नेह) निर्माण करण्यावर भर दिला.संविधान दिनानिमित्त (यौमे आईन) शाळेत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम शेख, उपाध्यक्ष अफरोज शेख, अन्सार शेख, वकार शेख, मोहसीन मनियार, जहांगीर शेख, इक्बाल शेख, सय्यद इमरान, मोहसीन शेख, उमर बेग, नासिर मनियार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी शेख जावेद रहीम यांनी पार पाडली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, जावेद रहीम, अन्सारी नवीदा, सना अन्सारी, दिलारा सय्यद, रीजवान शेख, खलील शेख यांनी मोलाची परिश्रम घेतले आहे







