जळगाव- राज्य शासनाच्या पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला जोरदार विरोध करत आज जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
दुपारी आयोजित या आंदोलनात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मराठी माती, मराठी भाषा”, “हिंदी सक्ती हद्दपार”, “मराठी शाळा, मराठी अभ्यास” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचे प्रतीकात्मक प्रती जलवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
या वेळी मनसेचे शहर प्रमुख, शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे पदाधिकारी, युवक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी सांगितले की, “छोट्या वयात मुलांवर भाषेची सक्ती करणे म्हणजे त्यांचे भावनिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य हिरावून घेणे होय. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच व्हायला हवे.”
शालेय अभ्यासक्रमामध्ये मातृभाषेला प्राधान्य दिले जावे, केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे कुठलेही धोरण हे स्थानिक संस्कृती आणि भाषिक अस्मितेच्या विरोधात असता कामा नये, असे मत या आंदोलनातून मांडण्यात आले.
शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनसे व शिवसेनेच्या (उद्धव गट) नेत्यांनी दिला.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, महानगराध्यक्ष किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, राहुल चव्हाण, महिला सेना अनिताताई कापुरे, नेहा चव्हाण, लक्ष्मीताई भील, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, साजन पाटील अविनाश जोशी, प्रदीप पाटील, रोहित माळी, मनोज लोहार, विलास सोनार, राहुल चौधरी, भोला धोबी, तरसोद शहर अध्यक्ष भूषण पाटील, दिनेश कलार, मंगेश भावे, शुभम सैनी, पश्चिम विभाग अध्यक्ष, नौशांक चौधरी, लोकेश ठाकूर, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.