
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: जामनेर-पहुर रस्त्यावर पिंपळगांव(गोलाईत) येथे काल दुपारच्या सुमारास पिकअप वाहन आणि मोटरसायकलचा जोरदार अपघात झाला.
या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पिकअप मधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले. जामनेर नगरीतील आरोग्यदुत जालमसिंग राजपूत व त्यांची टीम आणि सरकारी कार्यकर्ते घटनास्थळी धावून गेले असता अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हरवण्यात आले.
अंकुश लोखंडे(वय१९ वर्षे) अतुल सुरवाडे(वय२७ वर्षे) हे जामनेर शहरातील भीम नगर येथील रहिवासी असल्याचे माहीत झाले.
तसेच इतर दोन मृताचे तपशील अद्याप उपलब्ध नसून पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आणि जामनेर शहरात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.







