
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
भुसावळ येथिल २२ नोव्हेंबर २०२५ येथे संतोषी माता हॉल येथे
वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे (पूर्व), प्रमोद इंगळे (पक्ष्चिम) यांच्यासह बहुजन समाज पार्टी (बसपा), शिव सेना व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी तसेच इतर पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मोठ्या मा. ऍड.अमन आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मोठ्या जल्लोषमय वातावरणात हा प्रवेश सोहळा पार पडला.प्रवेश करणाऱ्यांमध्ये खालील प्रमुख नेते-कार्यकर्त्यांचा समावेश आहे वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रमोद दादा इंगळे , जिल्हा महासचिव दिनेश इखारे ,- देवदत्त मकासरे (मेजर),-हेमंत सोनवणे (वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हा का. सदस्य)गौतम पवार (वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, पारोळा),- वाल्मिक लोखंडे (जिल्हा सचिव, बसपा, भडगाव) ,शत्रुघ्न नेतकर (बसपा, चाळीसगाव) सारिपुत्त गाढे ,- दीपक इंगळे (मुक्ताईनगर),प्रशांत तायडे (न्हावी) , हमीद शहा (फैजपुर) दिलीप भालेराव भुसावळ
या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बसपा, मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनीही रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲड. अमन आनंदराज आंबेडकर हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे, उतर महाराष्ट्र नेते प्रा.डाॅ. विजय घोरपडे,उपस्थित होते.
प्रवेश सोहळ्याला संबोधित करताना ॲड. अमन आंबेडकर यांनी सांगितले, जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाज आज एका नव्या आशेच्या दिशेने चालला आहे. ज्या पक्षांनी दशकानुदशक बहुजनांना फसवले, त्यांचा आज निर्धाराने त्याग करत तुम्ही रिपब्लिकन सेनेत आलात, ही खरी आंबेडकरी क्रांती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद , जिल्हा परिषद, पंचायत या निवडणुकीत रिपब्लिकन सेना बहुजनांचा आवाज ठामपणे संधी देऊन मांडेल.”प्रदेश सचिव विनोद काळे यांनी प्रवेशित नेत्यांचे स्वागत करताना सांगितले की, “गेले अनेक महिने जळगाव जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची तळागाळातील कार्यकर्ते यांना न्याय देण्यासाठी वाट बघत होते. आजचा हा प्रवेश सोहळा त्याच यशस्वी संघर्षाचा एक टप्पा आहे.प्राताविकेत विनोद सोनवणे यांनी काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत असे प्रवेश सोहळे होणार आहे अशी ग्वाही दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिपुत्र गाढे यांनी केले.
सभेला बहुजन समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
रिपब्लिकन सेनेच्या या मोठ्या प्रवेश सोहळ्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.कार्यक्रमाच्या वेळी सरसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब व रिपब्लिकन कामगार सेना राज्य अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या आदेशाने व राज्य समन्वयक भाई विक्रम खरे यांच्या शिफारशीने जळगाव जिल्हा स्वाभिमानी आंबेडकरवादी झुंजार नेते जळगाव जिल्ह्याचे निळे वादळ प्रमोद दादा इंगळे यांना रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली युवा नेते ऍड.अमन आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व जळगांव जिल्हयाच्या जिल्हाध्यक्ष पदी विनोद सोनवणे यांच्या नावाची जाहीर घोषणा करण्यात आली याप्रसंगी आभार प्रदर्शन रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी मानले







