Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 22, 2025
in क्राईम
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना

स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस शिपायांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी गजानन सखाराम बोडखे यांनी फिर्याद दिली असून, श्याम अजिनाथ साळुंखे व त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बोडखे आणि त्यांचे सहकारी विशाल प्रभाकर पायघन हे अहिल्यानगर रेल्वे सुरक्षा बल येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आरोपी साळुंखेशी परिचय झाला. साळुंखे याने डीवायएसपी असल्याचे सांगून सध्या प्लॉटींगचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. त्याने दोघांनाही गुंतवणुकीची ऑफर दिली.

भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणार्‍या जागेवरील दोन प्लॉटसाठी प्रत्येकी २० लाख रुपये गुंठ्याप्रमाणे एकूण ४० लाख रुपये लागतील, असे आमिष त्याने दाखवले. त्यावर विश्वास ठेवून दोन्ही शिपायांनी बँक ऑफ इंडियाच्या लातूर  शाखेतील आरोपीच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण ४० लाख रुपये वर्ग केले. यासाठी त्यांनी बँकेतून मोठे कर्जही काढले.पैसे घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्याने आणि नंतर विचारणा केली असता, केवळ वेळकाढूपणा केल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आरोपी साळुंखे याने काही दिवसांनी ७ लाख रुपये परत केले, परंतु उर्वरित ३३ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली.या प्रकारानंतर, आपल्याला प्लॉट न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आल्याची खात्री झाल्यावर बोडखे यांनी पोलिसांत धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी श्याम साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत

Previous Post

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक; शेवगाव पोलिसांची दोन आरोपींना धरपकड

Next Post

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

Next Post

नगर शहरात वाहतूक कोंडीचा कळस; खासदार नीलेश लंके यांनी काय केले…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..