Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको’आंदोलनकुंभमेळ्यात साधूग्रामसाठी वृक्षतोडीला तीव्र विरोध, सरकार, महापालिकेच्या निर्णयाचा निषेध

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 22, 2025
in ताज्या बातम्या
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
कुभमेळ्यात साधूंसाठी उभारण्यात येणार्‍या साधूग्रामासाठी तपोवनातील तब्बल 1700 झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्याची छाटणीची नोटीस नाशिक महापालिकेने जारी केली आहे. महापालिकेच्या नोटीसवरून पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. आज शेकडो नागरिकांनी तपोवनामध्ये वृक्षअलिंगन आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान मुदत संपुष्टात येण्याच्या अखेरच दिवसापर्यंत हरकतींची संख्या 200 हून अधिकवर पोहोचली. यावर पुढील सोमवारी अथवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये 2027 मध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात साधू- महंताच्या वास्तव्यासाठी तपोवन साधूग्राम तयार केले जाते. आगामी सिंहस्थात सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजित आहे.तपोवनमध्ये महापालिकेची 54 एक्कर जागा आहे. येथील सुमारे 1700 विविध प्रजातींचे वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे, छाटणी आदींबाबत नोटीस देऊन महापालिकेने हरकती व सूचना मागविल्या होत्या. मंगळवारी त्याची मुदत संपुष्टात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचे समोर आल्या नंतर पर्याप्रेमीच नव्हे तर, नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. सर्व स्तरातून त्यास कडाडून विरोध होत आहे.

अनेक मोठ्या,प्रौढ, सावलीदार व परिसंस्थेतील महत्वाच्या झाडांवर पिवळे चिन्ह मारले असून यात कडूनिंब, चिंच, जांभूळ, वड, पिंपळ यांसारखी भारतीय ओळख दर्शविणार्‍या प्रजातीही अढळल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. अनेक झाडे इतकी जुनी, मोठी व पसरट आहेत की, त्यांची प्राचीन अर्थात हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होऊ शकते. असे वृक्ष तोडणे हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर, अध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या वेदनादायी निर्णय ठरेल. याकडे काहींनी लक्ष वेधले.

दरम्यान, 1700 झाडे तोडण्याचा परिणाम नाशिकचे हवामन, तलसाठा आणि हवा गुणवत्तेवर दीर्घकालीन घातक परिणाम करणारा ठरू शकतो. तपोवनसारख्या तपोभूमीत, संतांच्या निवासाठीच जर इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली तर जगापुढे अत्यंत विसंगत व चुकीचा संदेश जाईल, याकडे पार्यवरणप्रेमींनी लक्ष वेधले आहे. महानगरपालिकेचा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण करतो. राष्ट्रीय हरित लवादानेही वेळोवेळी दिलेल्या निर्णयात परिपक्व वृक्ष तोडू नये असे नमूद केलेले आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा निर्णय तातडीने स्थगित करावा, नागरिकांना हरकतींसाठी योग्य मुदतवाढ द्यावी, तज्ज्ञांसोबत प्रत्यक्ष संयुक्त पाहणी आयोजित करावी, उपलब्ध असल्यास सर्व पर्यावरणीय अहवाल व पर्यायी जागांचे मूल्यमापन सार्वजनिक करावे अशी मागणी हरकतींमधून झाली आहे. आज पर्यावरणप्रेमींनी तपोवणामध्ये वृक्षअलिंगण आंदोलन सुरू केले आहे.

तपोवणामधील एकही झाड तोडू देणार नसल्याचं म्हणत आंदोलन कर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, प्रसिद्धीपत्रकाद्वारे आंदोलकांनी सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीसाठी पंढरपुरात किमान 25 लाखांच्या गर्दीचा उच्चांक आहे. 2025 ला तर ही गर्दी साधारणपणे 25 लाखाच्याही पुढे गेली होती. 25,25 लाख लोकांचे नियोजन पंढरपूर सारखे छोटे शहर करून दाखवू शकते. नाशिकचे आकारमान पंढरपूर पेक्षा किमान दुप्पट आहे. कुंभमेळ्यासारखा कार्यक्रम आयोजित करण्याला आक्षेप नाही, परंतु त्यासाठी झाडे का तोडायची? ते साधूना तरी पटेल का? संसार सोडून अगदी निबिड जंगलामध्ये तपश्चर्याकरणार्‍या साधू संतांना झाडांचे काहीही वावडे नसते तर मग महानागरिपालिकेला आणि सरकारला का झाडांचे वावडे आहे? साधूंचे जर मत विचारात घेतले तर ते बिचारे म्हणतील एकही झाड आच्यासाठी तोडू नका. आम्हाला झाडाखालीच राहायची सवय आहे. नाशिक महापालिकेने पंढरपूर सारख्या छोट्या शहराकडून काहीतरी शिकावे अशी अपेक्षा व्यक्त करत नाशिक जिल्हा वृक्षतोडीचा बालेकिल्ला असे स्लोगन नाशिकच्या नावावर लागले नाही पाहिजे अशा संतप्त भावना व्यक्त करून सरकारसह महापालिकेला सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान आज पर्यावरणप्रेमींकडून तपोवनमध्ये वृक्षअलिंगण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तपोवनमधील एकही वृक्ष तोडू दिले जाणार नसल्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.

मंत्री गिरिष महाजन यांनी प्रतिक्रिया देत वृक्षतोडीचे एक प्रकारे समर्थन केले आहे. मोठ्या प्रमाणात साधू-महंतांच्या साधूग्रामसाठी वृक्षतोड करावी लागेल. साधूग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोड करण्यात येणार असली तरी आम्ही एका वृक्षाच्या बदल्यात दहा वृक्षांची लागवड करू’ या वक्तव्याचा पर्यावरणप्रेमींकडून निषेध करण्यात येत आहे.

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त करत मंत्री गिरिश महाजन जबाबदारमंत्री आहेत ते असं बोलूच कसं शकतात. 100 जणांचं बलिदान देऊ पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही. माणसं पेटून उठतील मी फक्त निमित्त असेन. कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी, खूप विरोध करावा लागेल. झाड तोडून दहा झाडे लावू हे विधान फालतू, सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. खरं तर माझ्या तोंडात शिव्या येतात. आज लोणंद सातरा रस्त्यावर 4000 झाडे ताडत आहेत, त्यात 400 वडाचे झाडं आहेत, नागपूरला 45000 झाडं तोडत आहेत, कर्जतला तोडत आहेत. सरकार आपलं असताना झाडांच्या बाबत बेजबाबदार वागत असल्याचा आरोप करत अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला

Previous Post

वरवंड येथे सरनोत फुड्स च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न,

Next Post

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक; शेवगाव पोलिसांची दोन आरोपींना धरपकड

Next Post

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक; शेवगाव पोलिसांची दोन आरोपींना धरपकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..