
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
वरवंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरनोत फुड्स आणि सरनोत फटाका मार्ट यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 140 रक्तदात्यांनी रक्त संकलन केले, यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, याप्रसंगी रक्तदातांचे उपस्थित मान्यवरांचे डॉक्टर यांचे विशाल सरनोत (वरवंडकर) यांनी स्वागत करून आभार मानले,
या रक्तदान शिबिरामध्ये अहिंसा नवकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयुर सरनोत (वरवंडकर) यांनी सांगितले रक्ताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, रक्तदाता हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे रक्तदान शिबिर घेऊन अशा समाज उपयोगी गोष्टी करणे काळाची गरज आहे एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि त्या व्यक्तीला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचले असे महत्त्वपूर्ण कार्यरत करते यापुढेही युवकांनी पुढे येऊन जास्तीत जास्त रक्तदान शिबिर घेऊन रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान केले,







