
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
वुशू या चायनीज मार्शल आर्टच्या राज्यस्तरीय २२ व्या सब-जुनिअर व २३ व्या ज्युनिअर स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने अभूतपूर्व अशी झेप घेत 10 पदकांची कमाई करत जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केले. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान धुळे येथील साईलक्ष्मी लॉन येथे ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन व वुशू असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांतील ४०० ते ५०० खेळाडू या स्पर्धेत उतरले होते. त्यात जळगाव जिल्हा पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या १२ जणांच्या चमूने पहिल्याच वर्षी झळाळती कामगिरी सादर करत 10 पदकांची कमाई केली. हा जळगाव जिल्ह्याचा इतिहासातील सर्वोत्तम निकाल असल्याचे वुशू महाराष्ट्रचे महासचिव सोपान कटके यांनी सांगितले.
विजेते खेळाडू (जळगाव जिल्हा पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी)
रजतपदक (Silver Medal)
- कौस्तुभ राजेंद्र जंजाळे
- प्राची किरण पाटील
- भूमिका अरुण मालपाणी
- लावण्या राकेश पाटील
कांस्यपदक (Bronze Medal)
5) जान्हवी सुनील शिंपी
6) अनिश महेश इंगळे
7) उर्वशी निलेश बोरणारे
8) अनय योगेश महाजन
9) मानव उद्धव हडपे
10) मनस्वी संदीप तायडे
रनर (Runner-Up)
11) श्रावणी विजयानंद शिंपी
12) अथर्व पराग वारके
अधिकारी व प्रशिक्षकांकडून अभिनंदन
विजयी सर्व खेळाडूंना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच पोलीस निरीक्षक (वेल्फेअर) संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना मिळालेले उत्तम मार्गदर्शन
अश्विनी निकम (जंजाळे), राजेंद्र जंजाळे, जागृती काळे, प्राजक्ता सोनवणे, प्रथमेश वाघ यांच्या प्रशिक्षणाचा ठसा खेळाडूंच्या दमदार कामगिरीत स्पष्टपणे उमटला.
जळगाव जिल्ह्याची राज्य पातळीवर दमदार उपस्थिती
वुशू स्पर्धेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पदके मिळवून जळगाव पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी नव्या उंचीचा ध्यास गाठला आहे. जिल्ह्यातील तरुणाईला या यशातून मोठी प्रेरणा मिळणार असून पुढील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही ही चमक कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जळगावचा विजय – शिस्त, मेहनत आणि खेळभावनेचा संगम!







