Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

वड्रीधरण वस्ती शाळेतील शिक्षकांची बेफिकीरी चरमसीमेवर!आदिवासी मुलांच्या शिक्षणाशी सुरू ‘खेळ’ ग्रामपंचायत सदस्य रमजान तडवी यांची संतप्त तक्रार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 20, 2025
in शैक्षणिक
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
ग्रामीण भागातील वस्ती शाळांमध्ये शिक्षकांची मनमानी आणि शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. परसळे येथील ग्रामपंचायत सदस्य व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक रमजान छबु तडवी यांनी वडरीधरण आसरा भारी वस्ती शाळेतील शिक्षकांविरोधात गंभीर आरोप करीत प्रशासनाला धडक तक्रार सादर केली आहे.
तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वस्ती शाळेत शिक्षक सलग तीन-तीन, चार-चार दिवस गैरहजर राहतात. शाळेत हजर राहण्याची वेळ सकाळी असतानाही संबंधित शिक्षक दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास येतात आणि फक्त तीन ते साडेतीनदरम्यान शाळा बंद करून निघून जातात.
शिक्षकांची ही ‘हजर असूनही गैरहजर’ अशी पद्धत गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याचा दावा तडवी यांनी केला आहे.
यातील धक्कादायक मुद्दा असा की
एकही रजेचा अर्ज शाळेत दाखल नसून शिक्षक तोंडी “रजेवर आहे” असे सांगून जबाबदारी टाळतात.
दोन वर्षांपूर्वीही तडवी यांनी तक्रार केली होती, मात्र गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी कोणतीही चौकशी केली नाही.
शिक्षक आठवड्यातून दोन सुट्ट्या स्वतःहून घेणे ही नियमित पद्धत बनली आहे.
तडवी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अशा प्रकारच्या निष्काळजी वर्तनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना ग्रामीण वस्ती शाळांकडे प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. अधिकारी कारवाई न करता शिक्षकांना मुक्तसंचार देत आहेत.”
ते पुढे म्हणाले
“वड्रीधरण शाळेतील परिस्थिती म्हणजे शिक्षण विभागाची विटंबना आहे. शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. ही माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून कठोर कारवाई व्हावी.”
रमजान छबु तडवी यांनी प्रशासनाचे डोळे उघडावे, शिक्षकांच्या उपस्थितीची चौकशी करून कठोर शिक्षात्मक कारवाई करावी, अशी ठणक मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील शाळांचा बोजवारा उडाल्यानंतर आता शिक्षण विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मालेगाव तालुक्यातील येथील डोंगराळे चिमुकली बालिका प्रकरणी पाचोरा अहीर सुवर्णकार समाजाचा वतीने तहसीलदारांना निवेदन कठोर कारवाईची मागणी

Next Post

पिंपरखेड हत्याकांड प्रकरणाची समता सैनिक दलातर्फे सी.आय.डी.चौकशी ची संदर्भात निवेदन मागणी- आयु किशोर डोंगरे

Next Post

पिंपरखेड हत्याकांड प्रकरणाची समता सैनिक दलातर्फे सी.आय.डी.चौकशी ची संदर्भात निवेदन मागणी- आयु किशोर डोंगरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..