
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
मालेगाव तालुक्यातील डोंगरखेडे येथे घडलेल्या निरागस चिमुकली बालिका वरील पाशवी अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी आज पाचोरा अहीर सुवर्णकार समाजातर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात आला. या अमानुष घटनेने संपूर्ण समाजमन संतप्त झाले असून आरोपीवर कठोरात-कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी सभेतून करण्यात आली.या निषेध सभेस आमदार किशोर आप्पा पाटील,सनीदादा वाघ तसेच अहीर सुवर्णकार समाजाचे समाजअध्यक्ष, युवाअध्यक्ष, महिला अध्यक्षा, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील ज्येष्ठ, महिला वर्ग, युवक, बालगोपाळ,व्यापारी बांधव—सर्वांनी एकत्रितपणे प्रचंड रोष व्यक्त केला.निषेध सभेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीने केलेला हा पाशवी कृत्य समाजमनाला हलवून टाकणारा आहे. चिमुकलीवर झालेला अत्याचार हा मानवतेवरचा कलंक असून, आरोपीला न्यायालयाने वेगवान सुनावणीद्वारे फाशीची शिक्षा देणे अत्यावश्यक आहे.सभेतून unanimously मागणी करण्यात आली की प्रशासनाने कोणतीही ढिलाई न ठेवता तात्काळ कठोर कारवाई करावी पीडित कुटुंबाला शासनाने त्वरित योग्य मदत व सुरक्षा द्यावी समाजातील सर्व घटकांनी एकसंघ राहून न्यायासाठी आवाज बुलंद ठेवावा सभेचा शेवट “बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे या घोषणांनी झाला पाचोरा अहीर सुवर्णकार समाजातील सर्व बांधवांनी या अमानुष घटनेचा तीव्र निंदा व निषेध व्यक्त करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त आहे केला







