
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडे उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 23 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रकाशित यादीमध्ये विविध प्रभागांतील उमेदवारांचे सविस्तर तपशील, त्यांचे पत्ते, अर्जांच्या प्रती क्रमांक, अनुसूचित जाती/जमाती/महिला राखीव गट अशा विविध प्रवर्गांनुसार नोंदी करण्यात आल्या आहेत. शिवाय, बहुतेक प्रभागांमधून महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येत असून, अनेक नवीन उमेदवारांसह अनुभवी चेहऱ्यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
एकूण अर्ज दाखल: 23 वेगवेगळ्या प्रभागांमधून महिलांचा वाढता सहभाग दिसत असुन
इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना, इतर पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
प्रभागनिहाय पाहता निवडणूक रंगतदार बनत असून महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातूनही अर्ज दाखल झाल्याने बहुआयामी स्पर्धा निर्माण झाली आहे. काही प्रभागांत एकाच कुटुंबातील अधिक सदस्य उमेदवारी अर्ज दाखल केल्याचेही चित्र दिसत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीप्रमाणे सर्व अर्जांची छाननी, हरकती-विरोध, अंतिम उमेदवारी यासंबंधीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार राबविण्यात येणार आहे.
यावलमधील नागरिक आणि राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढली असून, पुढील काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.







