
कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक भारताचे माजी पंतप्रधान स्व पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.विखुर्ले व रहिमपुरे येथील आजी-माजी विद्यार्थ्यांनी व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून निवृत्त मुख्याध्यापक श्री. डी एस नांद्रे सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. नंदलाल बागल सर यांच्याही याप्रसंगी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.रहिमपुरे गावाचे माजी सरपंच दिनेश बेडसे, सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले
जिभाऊ केदार, नवनाथ तिरमले,रामकृष्ण पाटील रविंद्र तिरमले,झिंगा तिरमले, प्रमोद तिरमले, न्हानुभाऊ केदार, रावसाहेब केदार,नागेश पाटील, प्रकाश रामसिंग तिरमले, किशोर काळुंखे ,तसेच अनेक माजी विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील मॅडम होते. माजी विद्यार्थ्यांनी श्री नांद्रे सर व बागल सर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश बेडसे यांनी केले.नवनीत बागले यांनी व रामकृष्ण पाटील हे माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले श्री व्ही डी पाटील सर, श्री एस बी सैंदाणे ,श्री महेंद्र मिस्तरी सौ राजश्री महाजन ,सौ प्रियंका गिरासे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री गणेश आप्पा पाटील, श्री संतोष बच्छाव कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन श्री एस बी सैंदाणे सर यांनी केले.







