
भगंदरवरील यशस्वी उपचारांमुळे ‘साई अभिनव’ हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आधारवड
नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या साईबाबांच्या शिकवणीला आपल्या आयुष्याचे ध्येय मानून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. किरण गोरे हे सध्या रुग्णसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण करत आहेत. ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ‘जर्मन लेझर तंत्रज्ञान’ उपलब्ध करून देत त्यांनी हजारो रुग्णांना मुळव्याध, भगंदरसारख्या त्रासदायक आजारांपासून वेदनामुक्त केले आहे. त्यांच्या राहता येथील ‘साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
मुळचे ग्रामीण भागातील असूनही डॉ. किरण गोरे ( गोल्ड मेडलिस्ट ) यांनी मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी साईबाबांच्या कर्मभूमीत राहून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आज अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील अनेक रुग्णांना संजीवनी मिळत आहे.
कोरोना काळातील निस्वार्थ सेवा
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग हतबल झाले होते, तेव्हा डॉ. गोरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठे योगदान दिले. शिर्डी येथे स्वखर्चाने ‘कोविड सेंटर’ सुरू करून त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले. तसेच, फोनद्वारे समुपदेशन आणि औषधोपचार सुचवून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल सर्व स्तरांतून घेण्यात आली.
जर्मन तंत्रज्ञानाची जादू आणि अचूक निदान
डॉ. गोरे हे प्रसिद्ध मुळव्याध व भगंदर तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. राहता येथील त्यांच्या ‘साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे जर्मन लेझर तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, फिशर, भगंदर , पिलोनिडल सायनस आणि व्हेरिकोज व्हेन्स यांवर यशस्वी आणि वेदनामुक्त शस्त्रक्रिया केल्या जातात. यासोबतच हे हॉस्पिटल ‘पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर’ म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. तसेच अपेंडिक्स, हर्निया व इतर जनरल शस्त्रक्रिया देखील येथे यशस्वीरित्या केल्या जातात.
रुग्णांचे अनुभव: वेदनेतून मुक्तता
डॉ. गोरे यांच्या अचूक क्लिनिकल लॉजिक आणि आधुनिक निदान पद्धतीमुळे अनेक गंभीर रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. शिर्डी येथील एका ४० वर्षीय रुग्णाने सांगितले की, “मी सहा महिन्यांपासून मुळव्याधाच्या असह्य वेदना सहन करत होतो. अनेक उपचारांनंतरही फरक पडत नव्हता. अखेर डॉ. गोरे यांनी ‘स्टॅपलर ऍनास्टोमोसिस’ या आधुनिक लेझर शस्त्रक्रियेद्वारे मला पूर्णपणे बरे केले.” संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील एका रुग्णाची आठ महिन्यांची पोटाची जुनाट समस्याही डॉ. गोरे यांच्या उपचाराने बरी झाली.
डॉ. किरण गोरे यांचा मनमिळावू स्वभाव आणि रुग्णांशी असलेली आपुलकीची वागणूक यामुळे रुग्ण अर्धा आजार तिथेच विसरतो, अशा भावना अनेक रुग्ण व्यक्त करतात. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे.







