
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
मारुळ (ता. यावल) येथील कर्तव्यदक्ष व विकासाभिमुख सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अहमद यांची यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे नेतृत्वनिर्मितीचे महत्त्वाचे पाऊल असून काँग्रेस पक्षामध्ये नवे ऊर्जासंचार झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटली आहे.
या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेश प्राप्त झाले होते. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार शिरीषदादा चौधरी, युवक प्रदेश सरचिटणीस धनंजय भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा निवड मंडळाची स्थापना करण्यात आली.
सैय्यद असद अहमद यांच्या निवडीने युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वामुळे येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितच भक्कम परिणाम दिसून येईल, असा सूर अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
ग्रामीण स्तरापासून ते तालुक्यापर्यंत संवाद, विकास आणि संघटनेची बांधणी या तीन प्रमुख ध्येयांवर ते लक्ष केंद्रित करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्दल खालील मान्यवरांनी अभिनंदन करून विश्वास व्यक्त केला आहेः
यावल तालुका अध्यक्ष शेखर बापू पाटील, सैय्यद जावेद अहमद, मसरुर अली सैय्यद, जियाउलहक सैय्यद, मतिूर रेहमान, हैदर जनाब, साहेब अली सैय्यद, इखलास सैय्यद, सुलतान पटेल, मुर्तेजा सैय्यद, मुक्तार उद्दीन फारूकी, रफत अली सैय्यद, सिताराम पाटील, मोहब्बत अली सैय्यद, तसेच ग्रा.पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.







