
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: दि:१०/११/२०२५ रोजी जळगाव-अजिंठा रोडवर वाकोद जवळ एका कारचे रनिंग ला असतांना टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला डिव्हाइडर ला धडकली व अचानक पेट घेतला.
त्यातील चालकाला काच फोडून बाहेर काढण्यात आले परंतु गाडीत धूर झाल्याने गाडीत असलेली महिला दिसली नाही.
चालकाला बाजूला नेल्या नंतर त्यांनी सोबत महिला असल्याचे सांगितले तो पर्यंत गाडीने जास्त पेट घेतलामुळे महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
घटनास्थळी पहुर पोलीस, महामार्ग पोलिस,आर टी ओ, वाकोद पोलीस पाटील ग्रामस्थ मदतीसाठी धावत होते वाकोद येथील टँकर व जामनेर येथील अग्निशमन दल गाडी कर्मचारी सुध्दा घटना स्थळी पोहचले होती.







