पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाचे पुणे जिल्हा अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार यांना चर्मकार समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिक चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले होते,
यावेळी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्मकार समाजाचे विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवावे अशी विनंती रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी निवेदनाद्वारे अतिरिक्त सह आयुक्त सुरेंद्र पवार यांच्याकडे केली,
चर्मकार समाजाच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास,
दिनांक 14 जुलै 2025 रोजी समाज कल्याण कार्यालय समोरील बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याची बनसोड यांनी सांगितले,
यावेळी संघटनेचे खजिनदार सुनील राठी व इतर पदाधिकारी उपस्थित होते,